Join us

सोनाली बेंद्रेचा मुलगा रणवीरने केली ही भावनिक पोस्ट शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 16:43 IST

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. नुकतेच तिचा मुलगा रणवीरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे.

ठळक मुद्देसोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर घेतेय उपचार

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांना देत आहे. सोनालीचा मुलगा रणवीर आपला अभ्यास आणि शाळेमुळे आईसोबत न्यूयॉर्कमध्ये नाही. नुकताच त्याचा तेरावा वाढदिवस झाला आणि महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदाच त्याच्या वाढदिवसादिवशी आई म्हणजे सोनाली त्याच्यासोबत नव्हती. यानंतर नुकतेच रणवीरने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे.

रणवीरने लिहिले की तुम्ही सर्व माझ्यासाठी आधार म्हणून उभे आहात, याबद्दल खुप खुप धन्यवाद.

सोनालीने रणवीरला वाढदिवसानिमित्त सोशल मिडीया अकाउंटवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. अत्यंत भावूक होत सोनालीने लिहीले होते की, रणवीररर... माझा सुर्य, माझा चंद्र, माझा तारा, माझा आकाश... ठीक आहे, कदाचित मी थोडी मेलोड्रामाटिक आहे. पण, तुझा १३ वा जन्मदिवस ह्या गोष्टींचा भागीदार आहे. वाह...!  आता तू टीनेजर आहेस. ही गोष्ट मान्य करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. मी तुला हे सांगू शकत नाही की तुझी तल्लख बुद्धी, तुझा मस्करी करण्याचा अंदाज, तुझी ताकद, दयाळूपणा व मस्तीखोरपणा या सर्व गोष्टींसाठी मला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. पहिल्यांदाच मी तुझ्या वाढदिवसादिवशी सोबत नाही. तुझी खूप आठवण येते. तुला माझ्याकडून खूप सारे प्रेम.

सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत. सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या तब्येतीबाबत सांगितले आहे. सोनालीची तब्येत चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे.

टॅग्स :सोनाली बेंद्रे