Join us

"माझे ओठ थरथरत असल्याचं पाहून त्याने...", सोनाली कुलकर्णीने सांगितला संजय दत्तसोबतचा बेडरुम सीनचा 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 3:48 PM

सोनालीने 'मिशन काश्मीर' या सिनेमामध्ये अभिनेता संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. 

सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मराठीबरोबरच सोनालीने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे. 'सिंघम', 'दिल चाहता है', 'मिशन काश्मीर', 'प्यार तुने क्या किया', 'दायरा' या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली आहे. सोनालीने 'मिशन काश्मीर' या सिनेमामध्ये अभिनेता संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमात तिने संजय दत्तच्या पत्नीची भूमिका साकारली होती.  सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शेअर केला आहे. 

सोनालीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने संजय दत्तबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर करताना बेडरुम सीनचा एक किस्सा सांगतिला. सोनाली म्हणाली, "आमचा एक सीन होता. त्या सीनला बेडरुम सीन असं नाव दिलं होतं. ज्याची काहीच गरज नव्हती. पण, होतं असं कधी कधी...तिथे जी हेअर ड्रेसर होती तिने मला कॉस्च्युम घातल्यानंतर अचानक विचारलं की तू वॅक्सिंग वगैरे केलंस का? मी गोंधळले आणि तिला हो म्हटलं. पण, तिने असं विचारल्यानंतर मी खूप नर्व्हस झाले होते".  

"मी सीनसाठी गेले. माझी पोझिशन घेतली. पण, माझं सीनमध्ये लक्षच लागत नव्हतं. माझे ओठ कापत होते. माझे हात थरथरत होते. सीन असा होता की संजय दत्त म्हणतो आज अलताफबने मुझे अब्बा बुलाया... त्यावर मी त्याला म्हणते की उसने पहले ही मुझे अम्मी बुलाया है...त्यानंतर आम्हाला मिठी मारायची होती. पण, मी खूप नर्व्हस झाले होते. संजय दत्तला ते कळलं. त्यांनी मला बोलवून एक मिनिट बसायला सांगितलं. तो म्हणाला हे बघ यामध्ये आपल्याला किसही करायचं नाहीये. काहीच नाहीये. फक्त डायलॉग आहेत आणि त्यानंतर आपल्याला मिठी मारायची आहे. आधीच मी नर्व्हस आहे. त्यात तू आणखी नर्व्हस झालीस तर हा सीनच होणार नाही. तर तू थोडं शांत हो. त्यानंतर मग तो बेडरूम सीन एकदम चांगल्याप्रकारे शूट झाला", असं सोनालीने सांगितलं. 

'मिशन काश्मीर' हा सिनेमा २००० साली प्रदर्शित झाला होता. विधू विनोद चोप्रा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात संजय दत्त, हृतिक रोशन, प्रिती झिंटा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात सोनालीने हृतिकच्या आईची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :संजय दत्तसोनाली कुलकर्णीसिनेमा