गतवर्षी सोनम कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम केली. यानंतर सोनम कपूरचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सोनमच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. सध्या सोनम ‘जोया फॅक्टर’ या आपल्या आगामी चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात सोनम पहिल्यांदा साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखित ‘जोया फॅक्टर’ या कादंबरीवर बेतलेली आहे. सोनम यात एका अॅड एक्झिक्युटीव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे. जी पुढे भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी चार्म ठरते. दुलकर सलमान यात क्रिकेट टीमच्या कर्णधाराची भूमिका साकारतोय. साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यामुळे ‘जोया फॅक्टर’ हा त्याचा दुसरा बॉलिवूडपट असणार आहे.
सोनम कपूरच्या ‘जोया फॅक्टर’साठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 16:04 IST
सोनम व दुलकरचा ‘जोया फॅक्टर’ हा सिनेमा यावर्षी ५ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे.
सोनम कपूरच्या ‘जोया फॅक्टर’साठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा!
ठळक मुद्दे या चित्रपटात सोनम पहिल्यांदा साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.