सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वडील अनिल कपूर यांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनमने अभिनयात करिअर करायचं ठरवलं. सोनम अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. सोनम कपूर कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच सोनमने मुंबईतील आयकॉनिक म्युझिक हाऊस खरेदी केली आहे. सोनम आणि पती आनंद अहुजाने हे हाऊस खरेदी केलं आहे.
सोनमने खरेदी केलेलं हे आयकॉनिक म्युझिक हाऊस मुंबईतील काला घोडा परिसरात आहे. जवळपास ३६०० स्क्वेअर फूट जागेत पसरलेलं हे म्युझिक हाऊस १९४० साली बांधण्यात आलं होतं. नीरव मोदीची मालकी असलेल्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल कंपनीकडून हे म्युझिक हाऊस चालविण्यात येत होतं. मात्र २०१८ मध्ये ते बंद करण्यात आलं होतं. आता सोनम आणि आनंद अहुजाने हे म्युझिक हाऊस ४७८.४ मिलियन डॉलर्सला विकत घेतलं आहे. भारतीय रुपयानुसार याची किंमत सुमारे ४७.८ कोटी इतकी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, शाही एक्सपोर्टच्या भाने ग्रुपकडून या प्रॉपर्टीची डील करण्यात आली आहे. शाही एक्सपोर्ट ही सोनम कपूरचे सासरे हरीश अहुजा यांच्या मालकीची कंपनी आहे. स्टेकहोल्डर कमिटीकडून हे आयकॉनिक म्युझिक हाऊस खरेदी करण्यासाठी मान्यता मिळाल्याची माहिती जवळच्या व्यक्तीने दिली आहे.