बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor)ने काही दिवसांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोनमने २० ऑगस्ट रोजी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आई बाबा बनल्यानंतर सोनम आणि आनंद अहुजा खूप खूश आहेत. ते सतत सोशल मीडियावरुन आपला आनंद व्यक्त करत असतात. दरम्यान आता सोनम आणि आनंद यांनी त्यांच्या बाळाचे नाव समोर आलं आहे. सोनमच्या बाळाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर सोनमने एक पोस्ट शेअर करत बाळाचे नाव सांगितलं आहे.
अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या मुलाची चाहत्यांना पहिली झलक दाखवली आहे. २० सप्टेंबरला सोनम आणि आनंद त्यांच्या चिमुकल्याचा पहिल्या महिन्याचा वाढदिवस साजरा केला आणि त्याचे नावही जाहीर केले. या दोघांनी मुलाचे नाव 'वायू' असे ठेवले आहे.
सोनमने इंस्टाग्रामवर त्यांच्या बाळाच्या नावाचा खूपच सुंदर अर्थ सांगितला आहे. त्यांनी हे नाव का ठेवले याचे स्पष्टीकरणदेखील तिने दिले आहे. वायू नावाचा अर्थ सांगताना तिने लिहिले, "आमच्या जीवनात नवीन आनंद आला आहे. हनुमान आणि भीम यांच्या प्रेरणेने, ज्यांनी अपार धैर्य आणि सामर्थ्य प्रकट केले आहे. आम्ही आमच्या मुलासाठी, वायू कपूर आहुजासाठी त्यांचे आशीर्वाद मागतो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये वायु हा पंच तत्वांपैकी एक आहे. तो श्वासोच्छवासाची देवता आहे, हनुमान, भीम आणि माधव यांचे आध्यात्मिक पिता आहे. वाऱ्याचा शक्तिशाली स्वामी वायू."