Join us

आदित्य ठाकरेंनी शेअर केला डेव्हिड बेकहॅमबरोबरचा फोटो, सोनम कपूर कमेंट करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:35 AM

डेव्हिड बेकहॅमसाठी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने वेलकम पार्टी आयोजित केली होती. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीदेखील या पार्टीला हजेरी लावली होती.

सध्या सर्वत्र वर्ल्डकपचा फिव्हर पाहायला मिळत आहे. भारताने न्यूझीलंडवर मात करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली. बुधवारी(१५ नोव्हेंबर) वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळाला. हा सामना पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याबरोबरच प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमदेखील या सामन्यासाठी उपस्थित होता. त्याचे फोटो व्हायरल झाले होते. 

डेव्हिड बेकहॅमसाठी बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने वेलकम पार्टी आयोजित केली होती. या पार्टीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनीदेखील या पार्टीला हजेरी लावली होती. आदित्य ठाकरेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या पार्टीतील काही फोटो शेअर केले आहेत. डेव्हिड बेकहॅमबरोबरचा फोटोही त्यांनी शेअर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी पार्टीचं आमंत्रण दिल्याबद्दल सोनम कपूरचे आभार मानले आहेत. 

आदित्य ठाकरेंनी शेअर केलेल्या या फोटोवर अभिनेत्री सोनम कपूरने कमेंट केली आहे. सोनमने कमेंट करत "द बेस्ट" असं म्हटलं आहे. सोनम कपूरने आदित्य ठाकरेंच्या फोटोवर केलेल्या या कमेंटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सोनम कपूरने डेव्हिड बेकहॅमसाठी आयोजित केलेल्या या पार्टीत मलायकरा अरोरा, अर्जुन कपूर, अनिल कपूर, शाहीद कपूर, करिश्मा कपूर या कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

टॅग्स :सोनम कपूरआदित्य ठाकरे