Join us  

सोनम कपूरला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अनिल कपूर यांनी नातवाचे केले जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 8:22 PM

Sonam Kapoor: बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरने २० ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूर(Sonam Kapoor)ने २० ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा (Anand Ahuja) हे दोघे सिनेइंडस्ट्रीतील नवीन पालक आहेत. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. डिलिव्हरीनंतर सोनम आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप असल्याचे सांगितले होते आणि आज सोनम आपल्या बाळाला घेऊन घरी परतली आहे. तिची कार हॉस्पिटलमधून निघतानाची छायाचित्रे समोर आली आहेत. तसेच नवीन आजोबा  झालेले अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) उत्साही असल्याचं पाहायला मिळाले. सोनमच्या चिमुकल्याचं दमदार स्वागत करण्यात आले. सोनमच्या स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांना मुलगा झाला आहे. सोनमला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला असून ती बाळाला घेऊन घरी परतली आहे. सोनमचे वडील अनिल कपूर यांनी नातवाचे जंगी स्वागत केले. यावेळी आजोबा अनिल कपूर हे सगळीकडे मिठाई वाटतानाही दिसून आले.

सोनम कपूर हिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली होती. यामध्ये सोनम कपूरने म्हटले होते की, २० ऑगस्ट २०२२ रोजी आम्ही आमच्या लहान बाळाला जन्म दिला.

आमच्या या प्रवासात आमच्यामागे खंबीरपणे उभे असणारे डॉक्टर्स, नर्स, मित्र-परिवार आणि कुटुंबियांचे मी आणि आनंद आम्ही मनापासून आभार मानतो. आमचा नवीन प्रवास आजपासून सुरु झाला आहे. पण, यामुळे आमचे आयुष्य बदलले आहे.

टॅग्स :सोनम कपूर