Join us

अखेर सोनम कपूरने दिली प्रेमाची कबुली; लंडनला असतो तिचा बॉयफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 1:01 PM

‘नीरजा’ चित्रपटातील अप्रतिम भूमिकेसाठी पुरस्कारांवर मोहर उमटविणाऱ्या सोनम कपूरचे सध्या सर्वत्रच कौतुक होत आहे. ‘फॅशन डिवा’ म्हणून प्रसिद्ध असलेली ...

‘नीरजा’ चित्रपटातील अप्रतिम भूमिकेसाठी पुरस्कारांवर मोहर उमटविणाऱ्या सोनम कपूरचे सध्या सर्वत्रच कौतुक होत आहे. ‘फॅशन डिवा’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोनम तिच्या पे्रमजीवनासाठीसुद्धा चर्चेत आहे. सोनमचा तो ‘रहस्यमयी’ बॉयफ्रेंड कोण आहे हा प्रश्न मीडिया आणि चाहत्यांना पडला आहे.अखेर ही ‘मिस्ट्री’ अंशत: का होईना पण सुटली. वादग्रस्त सेलिब्रेटी शो ‘कॉफी विथ करण’वर सोनमने तिच्या प्रेमाची पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली. होस्ट करणने शाब्दिक खेळ करून तिला क बुली देण्यास भागच पाडले. सोनमचा बॉयफ्रेंड लंडनस्थित आहे एवढी माहिती या शोवर मिळाली.करिना कपूरसोबत आलेल्या सोनमला करणने तिच्या बॉयफ्रेंड विषयी विचारले असता तिने यावर भाष्य करणे टाळले. ती बोलत नसल्याचे पाहून करणने प्रश्नाला थोडे फिरवून विचारले की, तुझे आणि लंडनस्थित एका व्यवसायिकाचे प्रेम असल्याची खूप चर्चा आहे. त्याविषयी काय सांगशील? यावर सोनमला गप्प राहता आले नाही.ती म्हणाली की, ‘मी दीर्घकाळापासून या ‘लंडनस्थित व्यवसायिकाला’ डेट करीत आले आहे. त्याचे नाव तर मी घेणार नाही पण एवढे मात्र नक्कीच सांगेन की, मला माझे खासगी आयुष्यावर सार्वजनिकरीत्या बोलायला आवडत नाही. कारण मला खूप भीती वाटते. माझे प्रेमजीवन ही माझी अत्यंत खासगी बाब असून मला ती तशीच ठेवायची आहे. त्यामुळे मी याविषयावर जास्त बोलणे टाळते.’चला, निदान एवढे तरी कळाले की, सोनम प्रेमात पडलेली असून लंडनच्या एक व्यवसायिकाला ती डेट करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनम आणि आनंद आहुजा यांच्या अफेयरची जोरदार चर्चा आहे. मध्यंतरी त्यांच्या साखरपुड्याचीसुद्धा बातमी आली होती. सोनमने हातात अंगठी घातलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होतो. अनेक कार्यक्रमांमध्ये ते एकत्रच सहभागी होतात.cnxoldfiles/a>. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याची कुजबुज इंडस्ट्रीमध्ये सुरू झाली होती.