Join us

इतका बॉडी शो कशाला? आई झाल्यानंतर काही तासांतच सोनम कपूरने शेअर केला फोटो, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 1:33 PM

Sonam Kapoor: 'वोग' या प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी सोनमने हे फोटोशूट केलं होतं. त्याचाच फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. मात्र तिचं हे बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीत उतरलं नाही...

बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor: ) काल शनिवारी आई झाली. सोनम व आनंद अहुजा यांच्या घरी एका गोंडस बाळाचं आगमन झालं. बाळाच्या आगमनाने कपूर आणि अहुजा कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. आई झाल्यानंतर काहीच तासांतच एका फॅशन मॅगझिनने सोनम कपूरच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.  सोनमने देखील तिच्या इन्स्टा अकाऊंटवर हे फोटो शेअर केलेत. या  फोटोमध्ये सोनमने बटन नसलेला शर्ट घातलेला आहे. फोटोत सोनमचा बेबी बम्प दिसतोय. 

सोनमने हे फोटो शेअर केलेत आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली. होय, तिचं हे बोल्ड फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीत उतरलं नाही. अनेकांनी तिच्या कपड्यांवरून तिला ट्रोल केलं.

तू आई झालीस याचा आनंद आहे, पण इतका बॉडी शो कशाला? असा संतप्त सवाल एका चाहत्याने केला. न्यूड होणं फॅशन असेल तर आम्हाला अशा फॅशनची गरज नाही, अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला आहे. असं न्यूड फोटोशूट करून बाळ सोन्याचं जन्मणार होतं का? असा सवालही एकाने केला.या फोटोसोबत सोनमने गरोदरपणाबद्दलचे मतंही शेअर केलं आहे. सोनमने बाळाच्या जन्माआधी संबंधित मॅगझिनला मुलाखत दिली होती. त्यात तिने हे मत मांडलं होतं.

मुलांना जन्म देणं हा स्वार्थी निर्णय... मूल झाल्यानंतर प्राथमिकता बदलतात. त्याच्या जन्मानंतर निश्चितपणे माझं बाळ माझी प्राथमिकता असणार आहे.  या गोष्टीचं सत्य एकच आहे, ते म्हणजे या जगात येण्याचा निर्णय त्याचा नाही. त्याने तो निर्णय घेतलेला नाही. तुम्ही मुलांना या जगात आणता, त्यामुळे हा एक अतिशय स्वार्थी निर्णय आहे, असं ती या मुलाखतीत म्हणाली.

 अनिल कपूर खुश्श...सोनम कपूरला मुलगा झाल्यामुळे अनिल कपूर आजोबा झाले आहेत. नातवाच्या जन्मानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ‘२० आॅगस्टला आमच्या कुटुंबात नवीन पाहुण्याचं आगमन झाल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सोनम आणि आनंद यांनी एका निरोगी मुलाला जन्म दिला आहे आणि आमच्या आनंदाला या क्षणी कोणतीही सीमा उरलेली नाही...,’ असं त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :सोनम कपूर