Join us

सोनम कपूरने केला भाऊ अर्जुन कपूरच्या सेक्स लाईफ बाबत मोठा गौप्यस्फोट, म्हणाली, मलायकाच्या आधी…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 23:35 IST

Sonam Kapoor & Arjun Kapoor in Koffee with Karan: भिनेता अर्जुन कपूर आणि त्याची चुलत बहीण सोनम कपूर कॉफी विथ करणच्या पुढच्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागामध्ये सोनम कपूरने तिचा भाऊ अर्जुन कपूर याच्या सेक्स लाईफबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई - अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची चुलत बहीण सोनम कपूर कॉफी विथ करणच्या पुढच्या भागात एकत्र दिसणार आहेत. या भागामध्ये सोनम कपूरने तिचा भाऊ अर्जुन कपूर याच्या सेक्स लाईफबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मलायकाला डेट करण्यापूर्वी अर्जुने किती तरुणींसोबत रात्र घालवली, याची माहिती तिने कार्यक्रमादरम्यान सांगितली.

कॉफी विथ करण कार्यक्रमातील अर्जुन कपूर आणि सोमन कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या भागाचा प्रोमो करण जोहरने रिलीज केला आहे. तो पाहून फॅन्स या एपिसोडची वाट पाहत आहेत. या एपिसोडमध्ये सोनमने अर्जुन कपूरच्या सेक्स लाईफबाबत असे काही गौप्यस्फोट केले, की जे ऐकून खुद्द अर्जुन कपूरही अवाक झाला.

करण जोहरने सोनम कपूरला विचारले की, अशा कुठल्या मैत्रिणी आहेत की ज्यांच्यसोबत सोनमचा भाऊ झोपले आहेत. म्हणजेच सोनमचा भाऊ आणि चुलत भाऊ यांनी तिच्या कुठल्या मैत्रिणीसोबत रात्र घालवली आहे. त्यावर सोनम कपूरने सांगितले की, ती या विषयावर बोलू इच्छित नाही. मात्र तिच्या भावांनी कुणालाही सोडलं नाही. 

सोनमचं हे उत्तर ऐकून करण जोहर आणि अर्जुन कपूर दोघेही अवाक झाले. त्यानंतर करणने ओरडून विचारलं की, सोनमचे भाऊ कशा प्रकारचे आहेत. तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि विषयांतर करण्यासाठी अर्जुन कपूर म्हणाला की, सोडा यार, सोनम तू कसली बहीण आहेस, या गोष्टी सगळ्यांसमोर बोलतेयस. सोनमच्या या दाव्याचा अर्थ लावायचा झाल्यास मलायकाला डेट करण्यापूर्वी अर्जुन कपूर सोमनच्या मैत्रिणींसोबत रात्री घालवत होता, असा होतो.  

टॅग्स :सोनम कपूरअर्जुन कपूरमलायका अरोराकरण जोहर