सोनम कपूर सतत या ना त्या कारणाने ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. यावेळी घराणेशाहीच्या मुद्यावरून ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट यांच्यावर नेटकरी वेगवेगळे आरोप करत आहेत. स्टार्स किड्सलाही ट्रोल केले जात आहे. अनिल कपूरची लेक असल्याने सोनमही ट्रोल होतेय. आता सोनमने या ट्रोलर्सला खरमरीत उत्तर दिले आहे.फादर्स डेच्या निमित्ताने सोनमने पोस्ट केली आणि यानिमित्तानेच नेपोटिझमवर बोलणा-यांना उत्तर दिले.
तू अनिल कपूरची मुलगी नसती तर...तूर्तास सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाटून आला असताना सोनम कपूरने उडी घेतली होती. तिने ट्विट केले होती आणि मग काय, या ट्विटमुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.
‘एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणा-या लोकांना दोष देणे चुकीचे आहे,’ असे ट्विट सोनमने केले होते. तिचे हे ट्विट वाचून नेटकरी भडकले होते. हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दा नाहीच तर बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला दोष दिला जात आहे, अशा शब्दांत नेटक-यांनी सोनमला खडसावले होते. एका युजरने तर थेट सोनमच्या अभिनयक्षमतेवर बोट ठेवले होते.‘अनिल कपूर यांची मुलगी नसतीस तर तू साफसफाईचे काम करत असतीस,' असे या युजरने लिहिले होते.