सोनम कपूर पती आनंद अहुजासोबत दिल्लीतील आपल्या सासरी आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे सोनम आणि आनंद दोघेही दिल्लीत आहेत. सोनमचे दिल्लीतील घर एखाद्या राजवाड्याप्रमाणे आहे. सोनम सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने नुकतेच तिच्या दिल्लीच्या घरातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून सोनमचे घर किती प्रशस्त आणि सुंदर आहे याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
सोनमने तिच्या बेडरूममधील एक फोटो पोस्ट केला असून तिचे बेडरूम खूपच छान आहे. यासोबतच क्वांरंटाईनमधील काही फोटो... असे तिने कॅप्शन दिले आहे. या फोटोत सोनम पुस्तक वाचताना दिसत आहे तर आनंद टॅबवर काम करताना दिसत आहे. यासोबतच सोनमने लिव्हिंग रूम, स्टडी रूम, किचन, गार्डनमधील देखील फोटो पोस्ट केले आहेत. सोनमचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
सोनम आणि आनंदच्या लग्नाला नुकतेच दोन वर्षं पूर्ण झाले आहेत. ८ मे ला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला सोनमने स्पेशल अंदाजात आनंदला शुभेच्छा दिल्या होत्या.
तिने त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, हा आमचा पहिला फोटो आहे. चार वर्षांपूर्वी मी अशा व्यक्तीला भेटले, जो कधीतरी योगा करतो आणि सतत रिटेल, बिझनेसबद्दल बोलतो. मला तो खूप कूल आणि सेक्सी वाटला. आजही माझ्या हृदयाचे ठोके वाढवितो आणि सोबतच मला जमिनीवर ठेवतो. तुझ्यासारखा कुणीच नाही.
२०१४ मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे. परनियाच्या माध्यमातून सोनम आाणि आनंद पहिल्यांदा भेटले. या पहिल्या भेटीच्या महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले आणि इथून या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली.