Join us

 जान्हवी कपूरच्या जिम शॉर्ट्सवरून मीडियावर भडकली सोनम कपूर! म्हणे, नो ड्रामा प्लीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 14:48 IST

कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवी कपूरच्या  तोकड्या कपड्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्याची बातमी आली. कॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली.

ठळक मुद्देकॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली.

कतरीना कैफने नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये जान्हवी कपूरच्या  तोकड्या कपड्यांवर चिंता व्यक्त केली आणि त्याची बातमी आली. कोणत्या सेलिब्रिटीचा जिम लूक तुला ओव्हर द टॉप म्हणजे अतिरेकी वाटतो? असा प्रश्न नेहाने कतरीनाला केला होता. यावर कॅटने जान्हवी कपूरचे नाव घेतले. जान्हवीचे जिम लूक मला ओव्हर द टॉप तर वाटत नाही. पण हो, तिचे इतके छोटे शॉर्ट्स पाहून मला चिंता वाटते. जान्हवी माझ्याच जिममध्ये येते. अनेकदा आम्ही सोबत वर्कआऊट करतो. मला तिचे शॉर्ट्स पाहून चिंता वाटत राहते, असे कॅट यावेळी म्हणाली.

कॅटने जान्हवीच्या कपड्यांवर चिंता व्यक्त केल्यानंतर पाठोपाठ सोनम कपूरची एक पोस्ट व्हायरल झाली.  ‘ती (जान्हवी)रेग्युलर कपडे घालते आणि शानदार दिसते,’ असे सोनमने डेनिम शॉर्ट्समधील जान्हवीचे फोटो शेअर करत लिहिले. खरे तर यात सोनमने कुठेही कतरीनाचे नाव घेतले नाही. पण सोनमचे हे उत्तर कतरीनासाठीच होते,असे मानून त्याचीही हेडलाईन झाली.

ही हेडलाईन वाचली आणि सोनम कपूर खरोखर बिथरली.  ती सुद्धा मीडियावर. होय, नो ड्रामा, असे तिने मीडियाला बजावले.   ‘मी कॅटच्या बोलण्यावर जान्हवीला डिफेंड करत नव्हे. मी अगदी निष्पापपणे ही पोस्ट टाकली होती. हा बहीणीसोबत (जान्हवी) केलेला एक खास जोक होता. प्लीज मीडियावाला यावरून ड्रामा करू नका,’ असे लिहित सोनमने याबद्दलचा खुलासा केला. एकंदर काय तर या वादात कतरीना आणि जान्हवी दोघीही वेगळ्या राहिल्या अन् सोनमचा सगळा राग मीडियावर निघाला. आता हा संपूर्ण एपिसोड इथेच थांबतो की आणखी वेगळे वळण घेतो, ते बघूच.

टॅग्स :सोनम कपूरकतरिना कैफजान्हवी कपूर