Join us

-अन् सोनमची विचित्र स्टाईल पाहून भाऊ आणि नवऱ्यानेच घेतली फिरकी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 8:51 PM

सोनम कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ अशीही तिची ओळख आहे. अलीकडे सोनमने सोशल मीडियावर स्वत:चा सुटाबुटातला फोटो शेअर केला. 

सोनम कपूर तिच्या फॅशन आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ अशीही तिची ओळख आहे. अलीकडे सोनमने सोशल मीडियावर स्वत:चा सुटाबुटातला फोटो शेअर केला. पण ही स्टाईल अनेकांना रूचली नाही. लोकांचे तर दूर; पण भाऊ अर्जुन कपूर आणि पती आनंद आहुजा यांचेही सोनमचा हा विचित्र लूक पाहून डोळे पांढरे झालेत. मग काय,त्यांनी यावरून सोनमला चांगलेच खेचले. अगदी दोघांनीही सोनमची फिरकी घेतली.

 आपला सुटाबुटातला फोटो शेअर करताना सोनमने ‘हाय, मी बिग ब्वॉयज क्लबची प्रेसिडेंट आहे,’ असे कॅप्शन दिले. 

अर्जुन कपूरने यावर भारी कमेंट केले. ‘मला माझा सूट परत हवा,’असे अर्जुनने लिहिले. याचे कारण म्हणजे, सोनमने घातलेला सूट चांगलाच सैल होता.

 लाडका हबी आनंद आहुजा यालाही आपल्या बायकोची फिरकी घेण्याचा मोह आवरला नाही. त्याने सोनमच्या लूकची टर उडवणारा एक फोटो पोस्ट केला. ‘सोनमनंतर मी हा सूट वापरू शकतो का?’ असा खट्याळ प्रश्न त्याने विचारला.आता सोनम यावर काय उत्तर देते, ते पाहूच. पण त्याआधी सोनमचा हा लूक तुम्हाला कसा वाटला ते सांगायला विसरू नका.

 

टॅग्स :सोनम कपूर