Join us

अनिल कपूरच्या फिटनेसचं सिक्रेट काय? सोनम कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:23 IST

अनिल अजूनही पूर्वीसारखे हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतात.

अनिल कपूर (Anil kapoor) बॉलिवूडमधील जणू आजन्म तारुण्याचे वरदान लाभलेले अभिनेता आहेत असेच म्हणावे लागेल. कारण वयाची ६७ ओलांडूनही ते एका तिशीतल्या तरूणासारखेच दिसतात आणि फिटनेस तर त्यांचा भल्याभल्यांना लाजवेल असा आहे. या वयात ते कसे स्वत:चे आरोग्य निरोगी राखतात आणि कोणकोणतं फिटनेस रुटीन ते फॉलो करतात, याचा खुलासा अनिल कपूर यांची मुलगी सोनम कपूरने केला आहे. 

सोनम कपूरने डॉक्टर शिव के सरीन यांच्या 'ओन युअर बॉडी : डॉक्टर्स लाईफ सेविंग टिप्स' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान वडील अनिल यांच्या फिटनेसचं रहस्य सांगितलं. सोबतच तिने बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या जिवनशैलीवरही भाष्य केलं. सोनम म्हणाली, 'माझे वडील मद्यपान आणि धुम्रपान करत नाही. त्यांना कुठलेही व्यसन नाही. त्यामुळेच ते इतके फिट आहेत. तर बोनी कपूर यांना विविध पदार्थ खायला खूप आवडतात आणि कधीतरी मद्यपानदेखील करतात. संजय कपूर हेदेखील तसेच आहेत. पण ते तिघेही तब्येत जपणारे आणि या वयातही सुंदर दिसणारे पुरुष आहेत'.

अनिल कपूर यांच्या फिटनिसेचं संपुर्ण श्रेय तिने तिची आई सुनीता यांना दिलं आहे. तिने सांगितले की, 'अगदी सुरुवातीपासून ती आरोग्याची खूप काळजी घेते.  आता तर त्यांचं वय ६० पेक्षा जास्त आहे. माझ्या आईने पहिल्यांदा मुंबईत वैयक्तिक जिमचं प्रशिक्षण घेतलं. हे खूप वर्षांपूर्वी घडलं होतं, त्यामुळे माझी आई सुरुवातीपासूनच खूप निरोगी आहे. वडिलांना आई खूप प्रोत्साहन देते'.

सोनम आणि अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, ती 2018 मध्ये 'झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती, जो फ्लॉप ठरला होता. यानंतर ती 'ब्लाइंड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तर अनिल कपूर हे अलीकडे 'ॲनिमल' आणि 'फायटर' सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. अनिल अजूनही पूर्वीसारखे हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतात.  त्यांचा 'झक्कास' अंदाज प्रत्येकाला आवडतो. ६७ वयात ही इतकं फिट राहणं अनिल कपूर यांना चांगलंच जमलंय. 

टॅग्स :सोनम कपूरअनिल कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडफिटनेस टिप्स