Join us

दिग्दर्शक अली अब्बास जफरवर भडकली सोनम; का ते जाणून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 18:07 IST

शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आत्तापर्यंतच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक समजला जातो. मात्र, अली अब्बास जफरने एक असे टिष्ट्वट केले की, सोनम कपूर त्याच्यावर नाराज झाली.

 अनिल क पूर आणि स्व.श्रीदेवी यांची अजरामर कलाकृ ती म्हणून आपण ‘मि.इंडिया’ चित्रपटाला संबोधतो. शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आत्तापर्यंतच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक समजला जातो. मात्र, अली अब्बास जफरने एक असे ट्विट केले की, सोनम कपूर त्याच्यावर नाराज झाली. आता ते ट्विट काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल...

नुकतेच दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एक ट्विट केले की, ‘मी झी स्टुडिओजसोबतच्या सहकार्याने ‘मि.इंडिया’ या चित्रपटाचा रिमेक बनवू इच्छितो. ही खरंतर एक मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम के लेल्या पात्रांना योग्य तो न्याय देणे हे महत्त्वाचे काम आहे. सध्या स्क्रिप्टवर काम करतोय. अजून तरी कुठल्याही अभिनेत्याला याबद्दल विचारलेले नाही. आम्ही जेव्हा स्क्रिप्टचा पहिला भाग पूर्ण करू, त्यानंतर आम्ही कास्टिंगला सुरूवात करू.’ 

या टिवटमुळे सोनम कपूर अहुजा प्रचंड नाराज झालीय. तिने निर्माता-दिग्दर्शक मंडळींवर चांगलीच नाराजी व्यक्त केलीय. तिचे म्हणणे आहे की, जफरने अनिल कपूर आणि शेखर कपूर यांची भेट यासंदर्भात घेतली नाही. त्यांनी या दोघांची भेट न घेताच ‘मि.इंडिया’चा रिमेक फायनल केला. 

सोनम कपूरने टिष्ट्वट केले की,‘ मला खुप जणांनी मि.इंडियाच्या रिमेकविषयी विचारले. पण, खरं सांगायचं तर, माझ्या वडिलांना तर चित्रपटाचा रिमेक बनवण्यात येणार आहे, हे देखील माहित नाही. आम्ही अली अब्बास जफर यांच्या पोस्टनंतर याचा उलगडा झाला. ही गोष्ट खरंच खूप अनादरणीय आणि अपमानजनक आहे. माझे वडील अनिल कपूर आणि शेखर कपूर यांचा या चित्रपटात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे यांना भेटून त्या रिमेकबद्दल माहिती द्यायलाच हवी. ’ 

टॅग्स :सोनम कपूरअली अब्बास जाफरअनिल कपूर