Join us  

आलिया भटने अमृता फडणवीसह'गायले तेरी गलियाँ' हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 6:19 PM

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017' हा सोहळा सा-यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असाच ठरला. कारण या सोहळ्याला बॉलीवुडच्या दिग्गजांनी उपस्थित राहत चारचाँद लावले.

यूपीएल प्रस्तुत लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर  पॉवर्ड बाय कर्म इन्फ्रास्ट्रक्चर आणि अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठ,पुणे यांच्या सहकार्याने  देदीप्यमान सोहळा पार पडला. या  पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मुंबईत जणू अवघं तारांगण अवतरलं होतं. मायानगरी मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्याला बी-टाऊनच्या दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली. दरवर्षी थाटामाटात पार पडणा-या या सोहळ्याची सा-यांनाच उत्सुकता असते. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील दिग्गजांचा गौरव या पुरस्कार सोहळ्यात केला जातो. विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणा-या महाराष्ट्रातील नागरिकांचा दिग्गज सेलिब्रिटींच्या हस्ते गौरव करण्यात येतो. त्यामुळे यंदा पार पडणा-या या सोहळ्याला कोण कोण सेलिब्रिटी उपस्थित राहणार याकडं सा-यांच्या नजरा होत्या. त्यामुळेच यंदाचा सोहळा नक्कीच स्पेशल असणार यांत शंका नव्हती अन् झालं ही अगदी तसंच. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017' हा सोहळा सा-यांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा असाच ठरला. कारण या सोहळ्याला बॉलीवुडच्या दिग्गजांनी उपस्थित राहत चारचाँद लावले.यांत सगळ्यांचं आकर्षण ठरले ते तरुणांच्या काळजाची धडकन असलेले दोन सुपरस्टार. एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि दुसरी म्हणजे अभिनेत्री आलिया भट. अभिनयाबरोबरच आलियाच्या गायकीचेही सारेच दिवाने आहेत. या सोहळ्यात आलियाला आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार स्विकारल्यानंतर लोकमत समूहाचे व्यवस्थापकीयसंचालक ऋषी दर्डा यांनी आलिया भट आणि रणबीर कपूरची प्रकट मुलाखत घेतली यावेळी दोघांनाही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले.त्यांनीही दिलखुलास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.मात्र आलिया उपस्थित असताना तिच्याकडे गाण्याची फर्माइश होणार नाही असं होवू शकणार नाही.त्यामुळे ऋषी दर्डा यांनी आलियाला मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीससह एक गाणे सादर करण्यास सांगितले.त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता. अमृता फडणवीस मंचावर आल्या. आलियासह अमृता यांनी कोणते गाणे सादर करावे यावंर चर्चा केली आणि मग काय एक सुंदर गाणे या दोघांनी सादर करताच टाळ्यांचा वर्षाव झाला. 'एक व्हिलन' सिनेमातील ''तेरी गलियाँ''.....हे गाणे या दोघांनी सादर केले.या दोघींच्या सुरांनी या पुरस्कार सोहळ्याची संध्याकाळ ख-या अर्थाने सूरमयी संध्याकाळ ठरली.