Join us

​गाणे मनातील विचारांचे प्रतिबिंब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2016 9:24 PM

- वीरेंद्रकुमार जोगीबॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये सामील असलेली शाल्मली खोलगडे व्हर्साटाईल गायनासाठी ओळखली जाते. आपल्या खुमासदार शैलीत गाणारी शाल्मली ...

- वीरेंद्रकुमार जोगीबॉलिवूडमधील आघाडीच्या गायिकांमध्ये सामील असलेली शाल्मली खोलगडे व्हर्साटाईल गायनासाठी ओळखली जाते. आपल्या खुमासदार शैलीत गाणारी शाल्मली लवकरच आपल्या ‘ए’ या नव्या गाण्याच्या माध्यमातून गीतकार, संगीतकार व दिग्दर्शिका म्हणून दिसणार आहे. या गाण्याविषयी तिने सीएनएक्सशी केलेल्या चर्चेचा हा सारांश...प्रश्न : तुझे नवे गाणे येत आहे, गायिका व दिग्दर्शिका अशा दोन्ही भूमिकेत तू यात दिसशील, अचानक असे दिग्दर्शनाकडे कशी वळालीस?शाल्मली - माझे नवे गाणे ‘ए’ कम्पोझ करीत असताना, ते पडद्यावर कसे असावे हे मला दिसायला लागले. त्यामुळे हा विचार माझ्या मनात डोकावला. याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मी जर कुणावर टाकली असती तर कदाचित माझा ‘व्ह्यू’ मिसिंग ठरला असता. माझे मित्र मायकी न्यूफर्री यांना याबद्दल सांगितले, त्यांनी मला हिंमत दिली. मला यातून बरेच काही शिकता येईल असे ते म्हणाले. यामुळेच मी ही हिंमत क रू शकली आहे. लोकांना हे गाणे आवडेल असे मला वाटते. प्रश्न : गायिका आणि दिग्दर्शक या भूमिकेतून ‘ए’ मधून कोणता विचार मांडला आहे?शाल्मली : ‘माय लाईफ माय टर्म’ हे या गाण्याचे मूळ आहे. आपल्या जीवनात बºयाचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला करायच्या असतात. त्या करताना कुणाचा तरी दबाब आपल्यावर असतो. यामुळे आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. माझे आयुष्य कसे असावे हे दाखविण्याचा प्रयत्न मी यातून केला आहे. माझे आयुष्य म्हणजे केवळ मुलीचे नव्हे तर एकंदर सर्व युवकांचा मी विचार करीत आहे. आजकाल फेमिनाईज होण्याची पद्धतच रुढ झाली आहे. हे त्यावर नाही हे विशेष. युवकांचा आपल्या आयुष्याबद्दलचा सर्वसमावेशक विचार यात आहे. प्रश्न : हा विचार कसा आला? शाल्मली : हे गाणे डोक्यात येण्यापूर्वी मी अनेक लोकांना भेटत होते, ज्यांनी आपल्या आयुष्यात बरच क ाही केलेय, काही अशा लोकांशी भेटले, जे खूप काही करू इच्छित होते. मला कधीच अशा समस्यांचा सामना करावा लागला नाही. माझ्या बाबतीत असे का? त्यांना का नाही करता येत. कुणाच्या आयुष्यात का अशी प्र्रेशर्स असावी? हा विचार सांगण्यासाठीच मी हे गाणे करण्याचे ठरविले. हे गाणे माझ्या मनातील विचारांचे प्रतिबिंब आहे. प्रश्न : तू क्लासिकल शिकली आहेस, मात्र तू नेहमीच वेस्टर्न स्टाईलने गातेस, क्लासिकलचा फायदा होतो का? शाल्मली : माझी आई इंडियन क्लासिकल संगीताचे क्लासेस चालवायची. तिच्याकडून मी गाणे शिकली, त्यानंतर मी शुभदा पराडक र यांच्याकडूनही धडे गिरविले. मात्र, माझा कल वेस्टर्न गाण्यात होता. माझा भाऊ इंग्रजी गाणी गायचा, त्यामुळे माझे आकर्षण वाढत गेले. पण मला आता वाटते आहे, की आईकडून व गुरूकडून मी जे काही शिकले त्याचा फायदा मला नक्कीच होत आहे. मी इंग्रजी गाणी ऐकत असल्याने हिंदी गाण्यासाठी मला गाण्याची खास शैली विकसित करता आली.प्रश्न : रिअ‍ॅलिटी शोच्या विजेत्यांना शो दरम्यान खूप ग्लॅमर मिळते मात्र नंतर ते कायम ठेऊ शकत नाहीत?शाल्मली : म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी तीन-चार महिने त्या स्पर्धेत असतात. यावेळी जे वातावरण तयार होते. यावेळी बरेच काही शिकता येते. याचा परिणाम दिसतो. विजेते ठरल्यावर किंवा एलिमिनेट झाल्यावर लगेच तशा पद्धतीच्या ग्लॅमरची अपेक्षा के ली जाते, मात्र तसे होत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, एक्स्पर्टचे मार्गदर्शन घ्यावे लागते, हे होत नाही. यशस्वी गायक व्हायचे असेल तर स्वत:ची ओळख असायला हवी. तुम्ही जर एखाद्या यशस्वी व्यक्तीसारखेच काम करणार असाल तर तुम्हाला काही वेळानंतर काम मिळणे कठीण होते. अरिजीत सिंग याने देखील आपले करिअर म्युझिक रिअ‍ॅलिटी शोमधून सुरू केले होते. तो शोमधून बाहेर पडला, त्याने मेहनत केली स्वत:ची गायन शैली विकसित केली आज तो यशस्वी गायक आहे हे आपण जाणतोच. म्युझिक शो मुळे ते झाले की नाही हे सांगणे कठीण आहे, मात्र मेहनत करून शैली विकसित करावीच लागते. प्रश्न : देशात ‘नोटबंदी’ची चांगलीच चर्चा होत आहे. म्युझिक इंडस्ट्रीवर याचा परिणाम होईल का? शाल्मली : (विचार करून.... ) आम्ही गाणी गातो, मग ती लेबल्सकडे जातात, गाण्यांची रॉयल्टी आम्हाला म्हणावी तशी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला तसा परिणाम पडणार नाही. पण आमच्या कमाईचा मोठा भाग शोज किंवा कार्यक्रमातून मिळतो. यावर त्याचा परिणाम दिसू लागलाय. पण हा फार काळ राहणार नाही. फारसा असा फरक पडणार नाही. प्रश्न : नायिका म्हणून तू एका सिनेमात काम केले आहेस, पुन्हा एकदा चित्रपटात काम करणार आहेस का?शाल्मली : हा इस्ट इंडियन चित्रपट होता. कोकणी आणि मराठी भाषेची मिश्रण असलेली ही भाषा आहे. चित्रपटात काम करायचे म्हंणाल तर माझी खूप इच्छा आहे. मलाही त्यात भूमिका करताना उत्साह वाटेल. पाहूया पुन्हा संधी मिळते काय? माझ्यासाठी चित्रपटात काम करणे एखाद्या अ‍ॅडव्हेंचरप्रमाणे असेल. प्रश्न : तुझ्या मते सध्या बॉलिवूडमध्ये टॉप सिंगर कोण? शाल्मली : बॉलिवूडमध्ये... मुलांमधून तर निश्चितच अरिजित सिग टॉप सिंगर आहे, गायक दिव्य कुमार मला आवडतो, मुलीमध्ये सुनिधी चौहान, माझी जवळची मैत्रिण निती मोहन व जोनिता गांधी मला खूप आवडते. ती खूप टॅलेंटेड गायिका आहे.