दरम्यान, सोनूच्या या प्रकरणानंतर उच्च न्यायालयाने मुंबई व नवी मुंबईतील मशिदींवरील भोंगे परवानगी घेऊन लावण्यात आलेत का? असा सवाल उपस्थित करीत विनापरवानगी भोंगे काढून टाका असे राज्य शासनाला आदेश दिले आहेत, तर आता या प्रकरणात काही राजकीय नेतेमंडळीही उडी घेऊ पाहत असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार मशिदींवरील भोंगे हटवण्याचा खमका निर्णय कधी घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. शिवाय सोनूच्या या ट्विटप्रकरणानंतर आता बॉलिवूडमध्ये फूट पडताना दिसत असून, कोणी त्याचे समर्थन करीत आहे, तर कोणी त्याच्या विरोधात उभे राहिले आहेत. प्रियंका चोपडाचा तर व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये प्रियंका चोप्रा अजानबद्दल बोलत आहे. ‘गंगाजल’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी शेअर करत प्रियंका सांगत आहे की, संध्याकाळी पॅकअप झाल्यानंतर छतावर बसून मी अजान ऐकत असे. मला त्यामुळे खूप शांती मिळत असे. तर काही कलाकारांनी सोनूचे समर्थन करीत त्याच्या बाजूने बोलत आहेत.}}}} ">Goodmorning India pic.twitter.com/gG8lqPZTSQ— Sonu Nigam (@sonunigam) April 23, 2017
सोनू निगमने अजान ट्विटनंतर शेअर केला अजान व्हिडिओ!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2017 9:51 AM
मशिदीवरील भोंग्यांवरून होणाºया अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने आज पुन्हा एक ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे.
मशिदीवरील भोंग्यांवरून होणाºया अजानबाबत वादग्रस्त ट्विट करून चर्चेत आलेल्या गायक सोनू निगमने आज पुन्हा एक ट्विट करत वाद ओढवून घेतला आहे. पाहटेच्या अजानचा येणारा आवाजाने त्याने एक व्हिडिओ अपलोड करताना कॅप्शनमध्ये ‘गुड मॉर्निंग इंडिया’ असे म्हटले आहे. गेल्या १७ एप्रिल रोजी सोनू निगमने मशिदीवरील भोंग्यांमधून अजानच्या आवाजावर आक्षेप नोंदविणारे एक ट्विट करून वाद ओढवून घेतला होता. त्याच्या या ट्विटनंतर सर्वत्र त्याचा जोरदार विरोधही केला गेला. पश्चिम बंगालमधील अल्पसंख्याक युनायटेश काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी तर सोनू निगमचे मुंडण करून त्याला चपलांचा हार घालणाºयाला दहा लाखांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी सोनू निगमने स्वत:च आपल्या मुस्लीम मित्राकडून मुंडण करून घेत जणू काही त्यांना आवाहनच दिले होते. त्याचबरोबर पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अन्वर शेख यांनी सोनूविरुद्ध तक्रारही दाखल केली. शिवाय सोनू निगमला पोलीस संरक्षणही देण्यात आले, परंतु हा वाद एवढ्यावरच थांबला नसून, आता पुन्हा सोनू निगमने त्याच्या घरातून ऐकू येत असलेल्या अजानच्या आवाजाचा एक व्हिडिओ शेअर करून वादात तेल टाकण्याचे काम केले आहे. सोनूच्या या ट्विटनंतर पुन्हा त्याला कडाडून विरोध होत असून, सोशल मीडियावर याचे पडसाद उमटताना स्पष्टपणे दिसत आहेत.