अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. त्यामुळे सोनू सूदचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे. आज सोनू सूदच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूदने 1999 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून ते प्रवास करत असलेल्या राज्य सरकारांच्या परवानग्या मिळवण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार सोनू पार पाडत आहे. त्यामुळे सगळ्यांकडून सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.