सध्या विविध सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी कनेक्ट आहेत. ट्विटर,फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्स सेलिब्रिटींशी संवाद साधत असतात. किंग खान शाहरुखपासून ते आमिर सलमानपर्यंत प्रत्येकाचे ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टावर आपले अकाऊंट आहे. जगभरात लाखोंच्या संख्येत चाहते या अभिनेत्यांना फॉलो करतात. मात्र लॉकडाऊन काळात लाखों गरजुंसाठी देवदुत बनलेला सोनू सूदने या सगळ्या अभिनेत्यांना मागे टाकत सोशल मीडियावर हिरो नंबर वन बनला आहे.
होय सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त सोनू सूदचाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सोनू सूद हा एकमेव अभिनेता आहे जो सर्वाधिक ट्विटरवर सक्रिय होता. सोशल मीडिया एनालिटिक्स फर्म ट्वीटी रिपोर्टनुसार यावर्षी कोरोना साथीच्या काळात ट्विटरचा सर्वाधिक वापर करणार्या बॉलिवूड स्टार्समध्ये सोनू सूद अव्वल स्थानावर आहे. यावर्षी सोनू सून ट्विटरवर खूप अॅक्टिव होता. या अहवालात तो चौथ्या क्रमांकावर आहे.
ट्विटरने आपल्या विश्लेषण अहवालात राजकारणी, लेखक, पत्रकार, कलाकार, व्यापारी नेते, संस्थापक आणि गुंतवणूकदार, क्रीडापटू, शेफ आणि कॉमेडियन या श्रेणीचा समावेश केला होता.ट्वीट अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसर्या क्रमांकावर कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत, तर तिसरा क्रमांक प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि चौथा अभिनेता सोनू सूद आहे.
अभिनेता सोनू सूदचे ट्विटरवर 4.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या फॉलोअर्सची संख्या सोनू सूदच्या फॉलोअर्सपेक्षा जास्त आहे. असे असूनही ट्विटरवर वापराबाबत सोनू सूद २.4 दशलक्ष असलेल्या बॉलिवूड स्टार्सपेक्षा वर आहे. विशेष म्हणजे यावर्षी कोरोना साथीच्या काळात सोनू सूदने ट्विटरच्या माध्यमातून लाखोंच्या संख्येत लोकांना मदत केली आहे.
ट्विटरद्वारे अनेक लोकांनी सोनू सूदची मदत घेतली. लॉकडाऊन पासून सुरू झालेलाल हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. अजूनही सोनू सूदचे मदत कार्य सुरू आहे. अभिनेत्याने लोकांच्या ट्विटला त्वरित प्रतिक्रिया दिली आणि मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे सोशल मीडियावरही सोनू सदूच सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता बनला आहे.