Join us

चाहत्याने चक्क देव्हाऱ्यात ठेवला सोनू सूदचा फोटो, व्हिडीओ पाहून अभिनेता म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 1:56 PM

एका चाहत्याने सोनू सूदला ‘देव’ मानत, देवाच्या मूर्तीशेजारी त्याचा फोटो ठेवला आणि पूजा केली.

ठळक मुद्दे अलीकडे सोनू सूद एका चित्रपटाचे शूटींग करत होता. काही गरजू लोक त्याठिकाणीही पोहोचले आणि त्यांनी सोनूला मदत करण्याची विनंती केली. दिलदार सोनूने या सर्व गरजूंना मदत करण्याचे वचन दिले.

  कोरोना महामारीच्या काळात बॉलिवूडचा एक हिरो अनेकांची प्रेरणा बनला. अनेकांना मदतीचे हात देणा-या या रिअल हिरोचे नाव काय तर सोनू सूद. हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यापासून तर बेरोजगारांना रोजगार देण्यापर्यंत आणि  विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवण्यापासून तर रूग्णांच्या सर्जरीचा खर्च उचलण्यापर्यंत सोनू सूदने प्रत्येक गरजूची मदत केली. आजही त्याच्या मदतीचा ओघ सुरुच आहे. अशा या दानशूर हिरोत कोणाला ‘देव’ दिसला तर आश्चर्य वाटायला नको. एका चाहत्याने थेट सोनू सूदला ‘देव’ मानत,  देव्हाऱ्यात  देवाच्या मूर्तीशेजारी त्याचा फोटो ठेवला आणि पूजा केली. या चाहत्याने याचा व्हिडीओ फोटो सोशल मीडियावर शेअर केला.  ‘खामोश होकर नेक कर्म किजीए दुआ खुद ही बोल पडेगी!! प्रणाम’ असे या चाहत्याने सोनू सूदला टॅग करत लिहिले.

चाहत्याच्या या ट्विटवर सोनूने काय उत्तर दिले माहित आहे? ‘मेरी जगह यहाँ नहीं... सिर्फ आपके दिलों में होनी चाहिए,’ असे सोनू सूदने यावर उत्तर दिले.अलीकडे सोनू सूद एका चित्रपटाचे शूटींग करत होता. काही गरजू लोक त्याठिकाणीही पोहोचले आणि त्यांनी सोनूला मदत करण्याची विनंती केली. दिलदार सोनूने या सर्व गरजूंना मदत करण्याचे वचन दिले.

35 विद्यार्थीनींची पायपीट संपवलीनुकतेच एका ट्विटर युजरने सोनू सूदला टॅग करुन मदत मागितली होती. उत्तर प्रदेशातील सोनभद्रा आणि मिझार्पूर येथील हजारो मुलींना 5 वीनंतरचे शिक्षण सोडून द्यावे लागते. नक्षली भाग आणि जंगलातून रोज 8 ते 15 किमीची पायपीट त्यामुळे अनेक मुली शिक्षण अर्धवट सोडून देतात. अशाच 35 मुलींसाठी मुलींसाठी संतोष नामक युजरने सोनू सूदकडे सायकल पुरवण्याची मदत मागितली होती. संतोषच्या या मदतीच्या मागणीची हाक सोनू सूदपर्यंत पोहोचली, त्यावेळी सोनूने या सर्व मुलींना नवीन सायकली घेऊन देण्याचेआश्वासन दिले. त्यानंतर, दुस-याच दिवशी या मुलींच्या गावात नवीन सायकली पोहोचल्या होत्या. 

टॅग्स :सोनू सूद