कोणाचे दिवस कधी बदलतील हे सांगता कामा नये. सोनू सूदचे दिवस तर आता पूर्णपणे बदलले आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठऱणार नाही. सोनूला एका मासिकाने काही वर्षांपूर्वी फोटो छापण्यास नकार दिला होता. पण त्याच मासिकाने आता कव्हर पेजवर त्याचा फोटो छापला असून त्याची भलीमोठी मुलाखत छापली आहे.
सोनू सूदने त्याच्या स्ट्रगलिंग काळात त्याचा एक फोटो स्टारडस्ट या मासिकाला पाठवला होता. पण त्यावेळी त्यांनी त्याचा फोटो छापण्यास नकार दिला होता. पण याच मासिकाने आता त्याची भलीमोठी मुलाखत छापली असून याच गोष्टीचा सोनूला प्रचंड आनंद झाला आहे. सोनूनेच ही गोष्ट सोशल मीडियाद्वारे सांगितली आहे.
सोनूने ट्विटरला स्टारडस्ट या मासिकाचे कव्हरपेज शेअर केले असून त्यासोबत लिहिले आहे की, काही वर्षांपूर्वी मी पंजाबहून माझे काही फोटो स्टारडस्टला पाठवले होते. पण त्यांनी माझे फोटो छापण्यास नकार दिला होता. पण त्यांनी आता माझी मुलाखत घेतली असून कव्हर पेजवर माझा फोटो छापला आहे. त्यासाठी त्यांचे आभार....
सोनू सूदने कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या दरम्यान अनेक मजदूरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. सोनूने त्याच्या खर्चाने मजदूरांची घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली होती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोनू अनेकांना औषधं, ऑक्सिजन सिलेंडर, इंजेक्शन मिळून देत आहे. सोनू लोकांसाठी आता देवदूत बनला आहे. सोनू चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करत असला तरी तो खऱ्या आयुष्यात नायक असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.