लॉकडाऊनमुळे हजारोंच्या संख्येतील मजूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेत. हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही, अशा अवस्थेत या मजूरांनी शेकडो किमीची पायपीट करत आपल्या मूळ गावाचा रस्ता धरला. अशात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद या मजुरांच्या मदतीसाठी धावला. त्याने असे काही केले की हजारो मजुरांनी त्याला तोंडभर आशीर्वाद दिला. होय, गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या मजुरांना सोनू सूद स्वखर्चाने त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवत आहे. बस सेवा सुरू आत्तापर्यंत हजारो गरिब, अगतिक मजुरांना त्याने त्याने मदतीचा हात दिला आहे. अशात सोनू या मजूरांसाठी अक्षरश: देव ठरला आहे. एकीकडे ट्विटरवरून लोक सोनू सूदला मदत मागत आहेत तर दुसरीकडे याच ट्विटरवर मीम्सद्वारे अनेकजण सोनू सूदचे आभार मानत आहेत. सध्या ट्विटरवर सोनू सूद हिरो बनला आहे. त्याचे नाव जबरदस्त ट्रेंडमध्ये आहे.
हजारो मजुरांच्या प्रवासाचीच नाही तर त्यांच्या जेवणाची सोयही सोनूने केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सरकारची परवानगी घेत, सोनूने ही बस सेवा सुरु केली. याअंतर्गत महाराष्ट्राच्या ठाण्यावरून मजुरांच्या अनेक गाड्या रवाना झाल्यात़ सोनूने स्वत: या मजुरांना निरोप दिला.याआधी सोनूने आपले अलिशान हॉटेल आरोग्य कर्मचा-यांसाठी खुले केले होते. इतकेच नाही तर पंजाबच्या डॉक्टरांना 1500 पीपीई किट्स दान केल्या होत्या.
मीम्समध्ये सर्वाधिक आलिया भटच्या एका फोटोचा वापर होताना दिसते. इतकेच नाही तर लोकांना भानूप्रसाद नावाने सोनू सूदची बस सर्विसही सुरु केली आहे. आत्तापर्यंत ही बस सर्विस तुम्ही केवळ ‘सूर्यवंशम’मध्ये पाहिली असेल.सोनू सूद स्वत:ही हे मीम्स शेअर करून खूश होतोय आता जरा हे मीम्स बघाच.