Join us

क्या बात! दुर्गा पूजा मंडळाने साकारला सोनू सूदच्या मूर्तीचा देखावा, म्हणाला - 'हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अवॉर्ड!'

By अमित इंगोले | Published: October 22, 2020 11:05 AM

लोकांनी सोनू सूदला भारत रत्न पुरस्कार देण्याचीही मागणी केली. अशात आता तर काही लोकांनी कोलकातामध्ये देखावा लावून सोनू सूदचे आभार मानले आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात लोकांसाठी देवदूताच्या रूपात मदतीसाठी समोर आला होता. त्याने लोकांना आपापल्या घरी पोहोचवले. अनेकांना सोनूने नोकऱ्या दिल्या. यासोबतच अनेक प्रकारची मदत केली. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरातून त्याचं कौतुक करण्यात आलं. इतकेच नाही तर लोकांनी सोनू सूदला भारत रत्न पुरस्कार देण्याचीही मागणी केली. अशात आता तर काही लोकांनी कोलकातामध्ये देखावा लावून सोनू सूदचे आभार मानले आहे.

कोलकातातील एका दुर्गोत्सव मंडळाने त्यांच्या पूजा पंडालमध्ये सोनू सूदची मूर्ती लावली आहे. असं करून लोकांनी त्याला देवाचा दर्जाच देऊन टाकलाय.  प्रफुल्ला कन्नन वेलफेअर असोसिएशन समितीने या मूर्ती लावल्या आहेत. या लोकांनी त्यांच्या देखाव्याची थीम 'प्रवासी मजूर' अशी ठेवली आहे. आपल्या देखाव्यातून लोकांनी सोनू सूदचा सन्मान केलाय.

या मंडळाचे सदस्य संजय दत्ता यांनी न्यूज एजन्सी एएनआयसोबत बोलताना सांगितले की, 'अभिनेता सोनू सूदची मूर्ती यासाठी लावली जेणेकरून लोकांनी प्रेरणा घ्यावी. सोबतच सोनू सूदप्रमाणेच इतर लोकांनीही गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे यावं.

मंडळाच्या या सन्मानावर अभिनेता सोनू सूदने प्रतिक्रियाही दिली आहे. त्याने ट्विट करत लिहिले की, 'हा माझा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरस्कार आहे'. सोनूच्या या ट्विटरवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. सोनूच्या फॅन्सनाही याने फार आनंद झाला आहे.  

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूड