Join us

बाबो! सोनू सूदकडे एका दिवशी किती लोक मागतात मदत? पहिल्यांदाच शेअर केली आकडेवारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:13 PM

सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे.

लॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सुपरहिरो ठरलेला सोनू सूद अजूनही लोकांची भरभरून मदत करत आहे. मजुरांच्या मदतीपासून सुरू झालेल्या त्याच्या या प्रवासाने आता व्यापक रूप घेतलं आहे. सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे.  

सोनूला रोज मदतीसाठी कितीतरी लोक वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतात. पण रोज नेमके किती लोक त्याच्याकडे  मदत मागतात याचा खुलासा आतापर्यंत करण्यात आला नव्हता. आता याची नेमकी आकडेवारी सोनूने ट्विटरवर शेअर केली आहे. एक दिवशी मदत मागणाऱ्यांची आकडेवारी पाहून लोक अवाक् झाले आहेत.

सोनूने लिहिले की, '११३७ मेल, १९००० फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टा मेसेज आणि ६७४१ ट्विटर मेसेज. हे आजचे मदतीचे मेसेज. सरासरी आकडेवारी पाहिली तर साधारण रोज इतके मदतीचे मेसेज येतात. एक माणूस म्हणून या सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो'.

सोनूने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, 'जर माझ्याकडून तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा'. दरम्यान सोनूने लॉकडाऊनपासून हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं आहे. त्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळी मदत लोकंनी मागितली. अनेकांना त्याने पुस्तके दिली, अनेकांची फि भरली. आता तो अनेकांना रोजगार देतो आहे. त्यासाठी त्याने एक अॅपही सुरू केलं आहे. 

राजस्थानला जाण्यासाठी एकाने मागितली कार, सोनू सूदचं उत्तर वाचून हसून लोटपोट झाले लोक!

पुराच्या पाण्यात घर गेले अन् पुस्तकही; ढसाढसा रडणाऱ्या मुलीला सोनू सूद म्हणाला, ताई अश्रू पूस! आता...

सुशांत प्रकरण CBI कडे; आता मुंबई पोलिसांत ठपका कुणावर?... आयुक्त, तपास अधिकाऱ्यांवर टांगती तलवार

टॅग्स :सोनू सूदबॉलिवूड