Join us

"प्रार्थनेत मोठी ताकद असते..." भीषण अपघातातून पत्नी वाचल्यानंतर सोनू सूदची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:10 IST

सोनू सूदने पत्नी सोनाली सूदच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनालीचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात (Sonu Sood Wife Accident) झाला होता.  हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या बोनटचा चेंदामेंदा झाला होता. पण, कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघातानंत सोनाली सूदलातातडीने नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तिची प्रकृती आता स्थिर असून चिंता करण्यासारखी बाब  नाही. सोनू सूदनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना पत्नीच्या प्रकृतीबद्दल (Sonu Sood Wife Health Update)अपडेट दिलं आहे. 

सोनू सूदने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्याने लिहलं, "प्रार्थनेत मोठी ताकद असते... हे पुन्हा एकदा जाणवलं. सर्व प्रार्थना आणि मनापासूनच्या पाठवलेल्या शुभेंच्छांसाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. तुमच्या पाठिंब्याचं मला खरोखरचं खूप कौतुक आहे. सोनाली आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांची प्रकृती बरी होत आहेत. तुमच्याकडून मिळालेलं प्रेम आणि दयाळूपणाबद्दल सदैव आभारी राहीन", या शब्दात त्याने कृतज्ञता व्यक्त केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सूदची कार एका ट्रकला धडकली होती.  सोनेगाव पोलिस स्टेशन हद्दीतील वर्धा उड्डाणपुलावर हा अपघात झाला होता. यावेळी कारमध्ये सोनाली सूद, तिची बहिण आणि  बहिणीचा मुलगा हे होते. तिघेही सुखरुप आहेत. 

सोनू सूद गरिबांना आणि गरिबांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. बॉलिवूडमधील सिनेमांशिवाय त्याने सामान्य नागरिकांना मदत करण्याची वृत्ती कायम ठेवली आहे.  सोनाली हीदेखील सोनूसोबत सामाजिक कार्यात पुढे असते. सोनू व सोनाली यांचं लग्न १९९६ मध्ये झालं होतं. सोनाली व सोनू यांना अयान व इशांत ही दोन मुलं आहेत.

टॅग्स :सोनू सूदअपघातसमृद्धी महामार्ग