कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक गरजूंसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत ठरला. अद्याप त्याचे हे मदतकार्य अजूनही सुरू आहे. या कामामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. अभिनेता नाही तर गरीबांचा देवदूत म्हणून लोक त्याची पूजा अर्चा करतात. दररोज त्याची मनोभावे लोक पूजा करतात. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे सोनू सूद चर्चेत असतो. सोनू सूद नॅशनल जिओग्राफीक इंडिया वाहिनीवरील दहा भागांची सीरिज 'इट हॅपेन्स ओन्ली इन इंडिया' या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतो आहे.
लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदने मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तो म्हणाला की, माझी मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. जर चांगली स्क्रीप्ट मिळाली तर नक्कीच काम करायला आवडेल. मराठी चित्रपटांच्या कथा खूप छान असतात. मला मराठीत इंटरेस्टिंग स्क्रिप्ट मिळाली तर मी नक्कीच मराठी भाषेतही काम करू शकेन.