बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून गरजूंची सर्वोतोपरी मदत करतोय. कोरोना काळात हजारो स्थलांतरित मजुरांना त्याने सुरक्षित घरी पोहोचवले. यानंतरही त्याच्या मदतीचा ओघ सुरु आहे. विदेशातील गरिब विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून तर शेतात राबणा-या शेतक-यांपर्यंत अशा अडल्या नडल्या सर्वांना शक्य ती मदत देण्याचा त्याचा प्रयत्न आहे. मात्र अशात काही लोक सोनू सूदच्या नावाचा वापरून लोकांना ठगवत आहेत. अशा ठगबाजांवर सोनू सूद जाम भडकला आहे. केवळ इतकेच नाही तर अशा ठकबाजांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही सोनू सूदने दिला आहे.
सोनूने ट्विटरवर काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. ‘सावधान, कृपा करून कोणालाही पैसे देऊ नका. आमच्या सर्व सेवा मोफत आहेत. गरीबांकडून पैसे उकळणाऱ्यांना मी एवढेच म्हणेल की, गरिबांना ठगण्यापेक्षा मला भेटा. कष्टाची भाकरी कशी कमवायची, हे मी तुम्हाला शिकवेन. चांगली व्यक्ति आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगायला शिकवेन,’ असे ट्विट सोनूने केले आहे.सोनूचे हे ट्विट सध्या व्हायरल होतेय.सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात देशभरातील हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सुरक्षित पोहोचवले होते. लोकांना घरी पोहोचवण्यापासून ते त्यांना जेवण, आर्थिक मदत, घरे, रोजगार देण्यापर्यंत त्याने सर्वकाही केले होते. त्याच्या या कार्यामुळे तो अनेकांसाठी रिअल लाईफ हिरो ठरला आहे. अजूनही लोकांना मदत करण्याचा सोनूचा सिलसिला सुरु आहे. सोशल मीडियावर त्याला लोक अजूनही मदत मागत आहेत.
कंगनावर साधला होता निशाना
काल-परवा सोनू सूदने सुशांत सिंग प्रकरणावर भाष्य करत अप्रत्यक्षपणे कंगना राणौतवर निशाणा साधला होता. ‘सन्मान मिळवण्यासाठी समोर या. केवळ प्रसिद्ध होण्यासाठी नाही. असे अनेक लोक प्रसिद्ध आहेत, जे आता कधीच सन्मान मिळवू शकणार नाहीत,’ असे ट्विट सोनूने केले होते.
कुणाचं काय तर कुणाचं काय! सोनू सूदकडे थेट भाजपाच्या तिकीटची डिमांड, त्याने दिलं मजेदार उत्तर!
सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण! कंगना-सोनूचा वाद जुना
कंगना राणौत आणि सोनू सूद यांच्यात मणिकर्णिका: द क्वीन आॅफ झांसी या सिनेमावरून वाद निर्माण झाला होता. कंगना या सिनेमात मुख्य भूमिकेत होती. या सिनेमामध्ये सोनूचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. मात्र 45 दिवस शूटिंग केल्यानंतर सोनूने हा सिनेमा सोडला होता. यावर सोनू महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करू इच्छित नाही, त्यामुळे त्याने सिनेमा सोडल्याचे कंगना म्हणाली होती. तिच्या या वक्तव्याने सोनू भडकला होता. महिलेच्या हाताखाली काम करण्यात मला कुठलीही लाज नाही. पण कंगनाने माझा रोल कापून अत्यंत छोटा केला होता म्हणून मी हा सिनेमा सोडल्याचे त्याने म्हटले होते.