Join us

तीन खानांमुळे सोनू वालियाने सोडली होती इंडस्ट्री, आता दिसते अशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:43 PM

सोनू त्याकाळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.

ठळक मुद्देसोनूने चित्रपटसृष्टी ही बॉलिवू़डमध्ये दबदबा असणाऱ्या तीन खानांमुळे सोडली. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल... पण हे खरे आहे. सोनूनेच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. 

सोनू वालियाचा आज वाढदिवस असून तिने १९८५ मध्ये ‘मिस इंडिया’ किताब जिंकला. यानंतर लगेच बॉलिवूडच्या ऑफर्स तिला मिळायला लागल्या. १९८८ मध्ये ‘आकर्षण’ या चित्रपटाद्वारे सोनूने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या चित्रपटात एका तलावाकाठी सोनूवर सेक्स सीन चित्रीत करण्यात आला होता. त्या काळात इतके हॉट दृश्य देण्यास नट्या धजावत नसत. पण सोनूने इतके बोल्ड दृश्य देण्याची हिंमत दाखवली होती आणि त्यामुळेच तिची चर्चा रंगली होती.

सोनूने या चित्रपटानंतर ‘खून भरी मांग’ या चित्रपटात रेखा, राकेश रोशन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. यानंतर तिने महादेव, क्लर्क, महासंग्राम, हातिमताई, तेजा, नंबरी आदमी, प्रतिकार, दिल आश्ना है यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण तिला तितकीशी प्रसिद्धी मिळाली नाही. तिने त्यानंतर काही बी ग्रेड चित्रपटांमध्येदेखील काम केले. पण तिला लोकांचे प्रेम काही मिळाले नाही. आता गेल्या अनेक वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. 

सोनूने चित्रपटसृष्टी ही बॉलिवू़डमध्ये दबदबा असणाऱ्या तीन खानांमुळे सोडली. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असेल... पण हे खरे आहे. सोनूनेच याविषयी एका मुलाखतीत सांगितले होते. 

बॉलिवूडच्या तिन्ही ‘खानां’मुळे मला काम मिळणे बंद झाले आणि मी बॉलिवूडमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे सोनूने सांगितले होते. बॉलिवूडच्या तिन्ही ‘खानां’पेक्षा सोनूची उंची बरीच होती. सोनूच्या मते, त्या काळात उंच मुलींना फार चित्रपट मिळत नसत.

बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर सोनूने हॉटेल मालक सूर्य प्रकाश यांच्याशी लग्न केले होते. पण काहीच वर्षात सूर्य प्रकाश यांचे निधन झाले. यानंतर सोनूने अमेरिकेत राहणारे निर्माते प्रताप सिंहसोबत लग्न केले. दोघांना एक मुलगी आहे. सध्या सोनू मुंबईत राहते.

टॅग्स :बॉलिवूड