Join us

कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 1:53 PM

‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत.

ठळक मुद्देकलंक या चित्रपटाच्या या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये सगळीच कास्ट दिसत असून या चित्रपटाचा काळ हा १९४० मधील आहे. टीजरमधील भव्य सेट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मल्टीस्टारर ‘कलंक’ या आगामी चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झालाय आणि  सोशल मीडियावर धूम करतोय. वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशा दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतानाच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. २ मिनिटं ५ सेकंदांच्या या टीजरमध्ये चित्रपटाच्या सर्व पात्रांची झलक पाहायला मिळतेय. टीजर बघता, या चित्रपटाची कथा प्रेम आणि धोका या गोष्टींभोवती फिरत असल्याचे भासते. ‘कुछ रिश्ते कर्ज की तरह होते है, उन्हे निभाना नहीं, चुकाना पडता है,’ असा वरूणच्या तोंडचा टीजरमधील एक संवाद मनाला भिडतो. ‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवादही लक्षवेधी ठरतोय. पण तुम्हाला माहीत आहे का याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. हे मिम्स सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. पाहा काय आहेत ते मिम्स...

 

 

 

 

 

 

 

 

कलंक या चित्रपटाच्या या दोन मिनिटांच्या टीझरमध्ये सगळीच कास्ट दिसत असून या चित्रपटाचा काळ हा १९४० मधील आहे. टीजरमधील भव्य सेट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. टीजरच्या शेवटच्या सीनमध्ये रावणाचा वध होतो आणि आलिया, वरूण एकमेकांना भेटतात, असे दाखवण्यात आले आहे. तूर्तास ‘कलंक’चा हा टीजर आणि त्याचसोबत त्यावर बनवण्यात आलेले मिम्स सोशल मीडियावर तुफान हिट ठरत आहेत. या चित्रपटाचे पोस्टर्स पाहून आधीच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. टीजर पाहून ही उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. 

कलंक हा चित्रपट आधी १९ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, पण आता तो १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यामागे एक खास गोष्ट आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती असल्याने अनेकांना सुट्टी असणार आहे. तसेच १९ एप्रिलला देखील गुड फ्रायडेची सुट्टी आहे. एकाच आठवड्यात असलेल्या या दोन सुट्ट्यांचा या चित्रपटाच्या कमाईला फायदा होईल असा विचार करूनच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे.

टॅग्स :कलंकवरूण धवनआलिया भटमाधुरी दिक्षितसंजय दत्त