Join us

Shilpa Shetty: राज कुंद्राला जामीन मिळताच शिल्पा शेट्टीने अशी व्यक्त केली भावना, आता ती पोस्ट होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 23:47 IST

Raj Kundra & Shilpa Shetty: राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर भावना मांडणारी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होऊ लागली आहे.

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेला प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अखेर आज कोर्टाने जामीन मंजूर केला. राज कुंद्रा दोन महिन्यांपासून तुरुंगात होता. पोर्न चित्रपटांची निर्मिती केल्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी १९ जुलै रोजी अटक केली होती. दरम्यान, राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर भावना मांडणारी एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता व्हायरल होऊ लागली आहे.

शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करून संदेश दिला आहे. शिल्पाने संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने लिहिले की, इंद्रधनुष्याचे अस्तित्व हे सांगण्यासाठी आहे की, एका वाईट वादळानंतर चांगल्या गोष्टी होऊ शकतात. शिल्पाचा हा कोट थेट तिच्या परिस्थितीकडे इशारा करतो. आजचा दिवस शिल्पासाठी खरोखरच खास ठरला आहे. तिची बहीण शमिता शेट्टी आणि पती राज कुंद्रा घरी परतले आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील कोर्टाने राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात ५० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजुर केला आहे. तत्पूर्वी मुंबई पोलिसांनी राज कुंद्राविरोधात चार्जशिट दाखल केली होती. १५०० पानांच्या चार्जशिटमध्ये ४३ साक्षीदारांची नावे देण्यात आली आहेत. आता याबाबत शिल्पाचा पोलिसांना दिलेला जबाबही समोर आला होता.

मुंबई पोलिसांनी माहिती दिली होती की, आरोपपत्रामध्ये ४३ साक्षीदारांची नावे रेकॉर्ड करण्यात आली आहेत. या ४३ साक्षीदारांमध्ये राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचेही नाव आहे. तसेच शर्लिन चोप्रा हिच्याही नावाचा यात समावेश होता. दरम्यान, मी माझ्या कामात व्यस्त होते. पती राज कुंद्रा काय करत होते, हे मला माहिती नाही, असा जबाब शिल्पाने दिला होता.  

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्राबॉलिवूड