बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक धाटणीचे, नव्या कथानकाचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, अमिताभ बच्चन यांच्या सूर्यवंशम (Sooryavansham) या चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. आजही हा चित्रपट आठवड्यातून एकदा तरी Set Max वर दाखवला जातो. त्यामुळे जुन्यासह नव्या पिढीलाही हा चित्रपट ओळखीचा आहे. गेल्या २०-२५ वर्षांपासून हा चित्रपट सातत्याने Set Max वर प्रसारित झाला. परंतु, आता यापुढे हा चित्रपट कधीही दाखवला जाणार नसल्याचं म्हटलं जातं. त्याऐवजी बॉलिवूडमधील नवे १० चित्रपट दाखणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
१. विवाह (Vivah) -
प्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा गाजलेला विवाह हा चित्रपट सेटमॅक्सवर दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात अमृता राव आणि शाहिद कपूर मुख्य भूमिकेत झळकले आहेत. कदाचित हा चित्रपट सूर्यवंशमला रिप्लेस करु शकतात.
२. बागबान (Baghban)
अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकले असून हा चित्रपटदेखील सेटमॅक्सवर दाखवला जाऊ शकतो.
३. टार्झन: द वंडर कार (Taarzan: The Wonder Car) -
या चित्रपटात एका गाडीची कथा सांगण्यात आली आहे. एक कार अचानकपणे कशी जिवंत होते आणि आपल्या शत्रूचा बदला घेते हे यात सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, वत्सल सेठ, अमरीश पुरी, आयशा टाकिया, शक्ती कपूर हे कलाकार झळकले आहेत.
४. जानी दुश्मन (Jaani Dushman) -
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्ध गायक सोनू निगमने अभिनय क्षेत्रात डेब्यू केलं. हा चित्रपट राजकुमार कोहली यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अरमान कोहली, सुनील शेट्टी, सनी देओल आणि मनीषा कोइराला हे कलाकार झळकले आहेत.
५. आबरा का डाबरा (Aabra Ka Daabra) -
या चित्रपटात एका लहान मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. जो आपल्या वडिलांना परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. या चित्रपटात अनुपम खेर, विशाल, अर्चना पूरण सिंह, हंसिका मोटवानी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
६. मेरी जंग: वन मॅन आर्मी (MASS) -
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून याची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात अॅक्शन सीनचा पुरेपूर भरणा करण्यात आला आहे. या चित्रपटात नागार्जुनसह ज्योतिका, राहुल देव यांची मुख्य भूमिका आहे.
७. हम साथ साथ हैं (Hum Saath Saath Hain) -
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हम साथ साथ है हा चित्रपटदेखील सेट मॅक्सवर दाखवला जाऊ शकतो. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत.
८. गदर: एक प्रेम कथा (Gadar: Ek Prem Katha) -
भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील एका प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. यात सनी देओल, अमीषा पटेल, अमरीश पुरी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
९. लोफर (Loafer) -
अनिल कपूर आणि जुही चावला या चित्रपटात झळकले असून हा कॉमेडी ड्रामा प्रकारातील चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं आहे.
१०. खलनायक (Khal Nayak) -
हा एक क्राइम-थ्रिलर चित्रपट आहे. यात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला आहे. माधुरी दिक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकले आहेत.