‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. आत्तापर्यंतच्या सर्व हॉलिवूडपटांना मागे टाकत,‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ बॉक्सआॅफिसवर कब्जा केला आहे. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूड चित्रपटांनाही ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने जोरदार मात दिली आहे. करण जोहरचा मोठा गाजावाजा करून प्रदर्शित झालेला ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ हा चित्रपटही ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’पुढे टिकू शकला नाही. अशात कुणी ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे.‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ला टुकार चित्रपट म्हणणा-यांना उत्तर देण्याच्या नादात आदित्यने या चित्रपटाची तुलना ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’शी केली आणि लोकांनी त्याला अक्षरश: वेड्यात काढले. ‘समाजाचा एक वर्ग ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’पाहून त्याचे कौतुक करतो, सुपरहिरो खरोखरच असतात, यावर विश्वास ठेवता आणि त्याचवेळी आमच्या चित्रपटावर टीका करतो,’असे आदित्यने लिहिले. आदित्यने हे म्हटले आणि लोकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले. ‘भाई दिमाग खोखला है क्या एकदम...’, असे एका युजरने आदित्यला सुनावले.
SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 15:02 IST
कुणी ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे.
SOTY 2 : भाई दिमाग खोखला है क्या एकदम...! लोकांनी घेतला आदित्य सीलचा क्लास!!
ठळक मुद्दे‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया लीड रोलमध्ये आहेत. आदित्य सील या चित्रपटात बॅड बॉय रूपात आहे.