दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करणारा सारन राजचा (Saran Raj) अपघातातमृत्यू झाला आहे. त्याचं वय अवघं २९ वर्षे होतं. रस्ते अपघातात त्याचं निधन झालं. सारन राज दिग्दर्शक वेत्रीरमन यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचा. काल रोड अॅक्सीडेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.
काल रात्री सारन राज नशेत गाडी चालवत होता. साडे अकराच्या सुमारास दुर्घटना घडली. तो केके नगरच्या आरकोट रोडवर बाईकवरुन जात होता तेव्हाच समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. आसपासच्या लोकांनी तात्काळ पोलिसांना सूचना केली. सारनला धडक देणारा दुसरा तिसरा कुणी नसून आणखी एक सपोर्टिंग अभिनेताच होता. पलानीअप्पन (Palaniappan) या सहाय्यक अभिनेत्याच्या कार आणि सारनच्या बाईकची धडक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. यामध्ये सारनला गंभीर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
सारन राजने धनुषचा सिनेमा 'असुरन' आणि वडा चेन्नईमध्ये काम केलं आहे. त्याने तमिळच्या आणखी काही सिनेमांमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत. त्याचे शव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. तर पलानीअप्पनविरोधात केस दाखल करण्यात आली आहे. या अपघातामुळे दाक्षिणात्य सिनेसृष्टी सुन्न झाली आहे.