दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपति (Vijay Setupathi) सध्या 'मेरी क्रिसमस' सिनेमामुळे चर्चेत आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या सिनेमात त्याची कतरिना कैफसोबत केमिस्ट्री आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त विजयने नुकताच एक खुलासा केला. 2019 मध्ये त्याचा 'सुपर डीलक्स'हा सिनेमा ऑस्करला जाऊ शकला नाही. त्याऐवजी रणवीर सिंहचा 'गली बॉय' (Gully Boy) सिनेमा पाठवण्यात आला होता. 'सुपर डीलक्स' सिनेमाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. मात्र तरी सिनेमा ऑस्करला पाठवण्यात आला नसल्याने तो नाराज झाला होता.
विजय सेतुपतिने 'सुपर डीलक्स' सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विजयला अशीही अपेक्षा होती की सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात येईल. कारण प्रेक्षकांनीही सिनेमा उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र 'सुपर डीलक्स'च्या जागी रणवीर सिंहच्या 'गली बॉय'ची निवड झाली. यामुळे त्याला खूप दु:ख झालं होतं.
विजय म्हणाला, 'ही माझ्यासाठी आणि सिनेमाच्या टीमसाठी खूप दु:खद गोष्ट होती. मी खूप नाराज झालो होतो, हे स्पष्टपणे राजकारण होतं. आम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की काहीतरी झालं होतं. मी त्या सिनेमात होतो म्हणून मी हे बोलत नाहीए, मी त्यात नसतो तरी हा सिनेमा ऑस्करला जावा अशी माझी इच्छा असली असती. मध्येच काहीतरी झालं मला त्यावर आता बोलायचं नाही. कारण आता बोलून काही उपयोग नाही.'
'सुपर डीलक्स'ची गोष्ट त्यागराजन कुमारराजा ने लिहिली आणि दिग्दर्शित केली होती. सिनेमा फहद फासिल, विजय सेतुपति, समंथा रुथ प्रभू आणि राम्या कृष्णन यांची भूमिका होती. सिनेमात चार वेगवेगळ्या गोष्टी होत्या ज्या चार वेगवेगळ्या समाजाभोवती फिरणाऱ्या होत्या ज्या एकाच दिवशी घडलेल्या घटनेवर आधारित असतात.
विजय सेतुपति सध्या बॉलिवूडमध्येही जम बसवत आहे. त्याने शाहरुख खानच्या 'जवान' सिनेमात खलनायकाची भूमिका साकारली. तर शाहीद कपूरसोबत 'फर्जी' वेबसिरीजमध्ये तो पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला. आता त्याचा कतरिनासोबत 'मेरी ख्रिसमस' रिलीज होत आहे.