सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.काजल सध्या लग्नाच्या तायरीत बिझी आहे. काजल अग्रवालने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्याl तिच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसते आहे. काजल 30 ऑक्टोबरला गौतम किचलूसोबत सात फेरे घेणार आहे. दोघांच्या लग्नात कुटुंब आणि काही जवळचे मित्र असतील. अलीकडेच तिचे बॅचलर पार्टीचे फोटो व्हायरल झाले होते. गौतम एक बिझनेसमॅन आहे. पेशाने इंटिरिअर डिझाईनर आहे.
काजलने लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर कन्फर्म केली होती. ‘मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे,’असे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.