साऊथ ब्युटी नयनतारा (Nayanthara) शाहरुखच्या 'जवान' (Jawan) सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करत आहे. नयनतारा आणि शाहरुखची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. आज 'जवान' सर्वत्र रिलीज झालाय. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारने 'जवान'चं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अनेक साऊथ कलाकारांची मांदियाळी आहे. पण तुम्हाला माहितीये का नयनताराला १० वर्षांपूर्वीच शाहरुखसोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. पण तिने विनम्रतेने नकार दिला होता. कोणता होता तो सिनेमा?
नयनतारा साऊथची लेडी सुपरस्टार आहे. साऊथमध्ये ती सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता तर ती थेट किंग खानसोबत बॉलिवूड डेब्यू करत आहे. यासाठी तिने तब्बल ११ कोटी रुपये मानधन घेतलं असल्याची चर्चा आहे. बॉलिवूड अभिनेत्रींना इतक्या कमाईपर्यंत पोहोचायला वर्षानुवर्ष लागतात. नयनताराला ही संधी खरंतर १० वर्षांपूर्वीच मिळत होती जी तिने नाकारली.
२०१३ साली आलेला रोहित शेट्टीचा सुपरहिट सिनेमा 'चेन्नई एक्सप्रेस' मध्ये नयनताराला एका गाण्याची ऑफर मिळाली होती. ते म्हणजे सुपरहिट गाणं 'वन टू थ्री फोर...'. नयनताराला हे आयटम साँग करण्यासाठी स्वत: रोहित शेट्टीने विचारलं होतं. मात्र तिने विनम्रतेने नकार दिला. शाहरुखसोबत काम तेव्हा कोणी नकार देईल अशी कल्पनाही रोहितने केली नसेल. पण उगाच नाही नयनताराला लेडी सुपरस्टार म्हणलं जातं. ती बॉलिवूडमध्ये एका आयटम साँगसाठी नक्कीच येणार नाही.
नयनताराने नकार दिल्यानंतर साऊथ अभिनेत्री प्रियमणिने ते गाणं केलं. जे खूप हिट झालं. प्रियमणि देखील साऊथमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती देखील आता शाहरुखसोबत 'जवान'सिनेमात भूमिका साकारत आहे. जवानच्या मेकिंगवेळी शाहरुखनेच नयनतारासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नयनतारा ही मुख्य अभिनेत्रीची ऑफर का नाकारेल. आता ती जवानमध्ये शाहरुखच्या अपोझिट पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसत आहे.