Join us

ती आली, तिने पाहिलं, अन् इन्स्टाग्राम जिंकलं! साऊथ ब्यूटी नयनताराची ग्रँड एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 14:43 IST

जवानच्या रिलीजआधी नयनताराने चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) आगामी 'जवान' (Jawan) सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. यामध्ये किंग खानचे अनेक ढासूँ लुक दिसत आहेत. तर साऊथ ब्यूटी नयनतारा (Nayanthara) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच तिने चाहत्यांना सरप्राईज दिलंय. तिचे करोडो चाहते तिला सोशल मीडियावर मिस करत होते. त्यामुळे तिने अखेर इन्स्टाग्रामवर कडक एंट्री घेतली आहे. 'जवान'च्या ट्रेलरसोबतच आपल्या जुळ्या मुलांचा एक क्युट व्हिडिओ शेअर करत ती इन्स्टाग्रामवर आली आहे.

नयनतारा साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या वर्षी तिने साऊथ दिग्दर्शक विघ्नेश सिवनसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाला शाहरुख खानने हजेरी लावली होती. तेव्हापासून नयनतारा चर्चेत आली. लग्नानंतर काहीच महिन्यात तिने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. या जुळ्या मुलांना कडेवर घेत तिने क्युट व्हिडिओ पोस्ट केला आहे. तर बॅकग्राऊंडला जवानचं थिम म्युझिकही लावलं आहे. 'सांगा त्यांना मी आले आहे...' असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे.

या व्हिडिओमध्ये तिच्या दोन्ही मुलांनी गॉगल लावला आहे. दोघंही खूपच क्युट दिसत आहेत. नयनताराची ही ग्रँड एंट्री  चाहत्यांना भलतीच पसंतीस पडली आहे. काही तासातच तिला ५ लाख लोकांनी फॉलो केले आहे. तिचं इन्स्टाग्रामवर स्वागत केलं आहे. ७ सप्टेंबर ला 'जवान'रिलीज होतोय. शाहरुख खानचे सिनेमात ५ लुक आहेत. तर किंग खान आणि नयनताराची केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे.

टॅग्स :नयनताराजवान चित्रपटशाहरुख खानइन्स्टाग्राम