Join us

'बाप, बाप होता हैं'! वडिलांच्या डान्सपुढे प्रभुदेवा झाला फेल; तुम्ही पाहिला का जबरदस्त व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 11:11 IST

Prabhudeva: सोशल मीडियावर सध्या प्रभुदेवा आणि त्याच्या वडिलांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

प्रभुदेवा (prabhudeva) हे नाव जगभरातील कोणत्याही व्यक्तीला नवीन नाही. आपल्या दमदार नृत्यशैलीमुळे प्रभुदेवाने देशासह विदेशातही लोकप्रियता मिळवली आहे. भारताचा मायकल जॅक्सन या नावाने ओळखला जाणारा प्रभुदेवा नृत्यदिग्दर्शक असण्यासोबतच एक उत्तम अभिनेता सुद्धा आहे. प्रभुदेवाच्या डान्सचे आज लाखो चाहते असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे त्याची प्रत्येक डान्स स्टेप सुपरहिट होते. परंतु, सध्या सोशल मीडियावर प्रभुदेवापेक्षा त्याच्या वडिलांच्या डान्सची चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावर सध्या प्रभुदेवा आणि त्याच्या वडिलांचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभुदेवासोबत त्याच्या वडिलांनी ताल धरला आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या डान्स समोर प्रभुदेवादेखील फेल झाला आहे.  त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या बाप-लेकाच्या डान्सची तुफान चर्चा रंगली आहे.

अलिकडेच Dance + 2  या डान्स रिअॅलिटी शोमध्ये प्रभुदेवासह त्याच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रभुदेवा आणि त्याच्या वडिलांनी 'गंदी बात' या गाण्यावर एकत्र डान्स केला. हा डान्स करत असताना प्रभुदेवाच्या वडिलांची एनर्जी पाहून अनेक जण थक्क झाले. इतकंच नाही तर प्रभुदेवाला डान्सची प्रेरणा कुठून मिळाले हे देखील चाहत्यांना कळलं. 

टॅग्स :प्रभू देवासेलिब्रिटीबॉलिवूडTollywood