Join us

'ते' एक वाक्य बोलून काजोलने केली मोठी चूक; गमावला हाती आलेला मणिरत्नम यांचा 'दिल से'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 15:01 IST

Kajol: वेंधळेपणामुळे काजोलने गमावला मणिरत्नम यांचा सिनेमा; झाला होता पश्चाताप

'साथिया', 'गुरु', 'दिल से', 'रोजा', 'बॉम्बे' असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारा प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे मणिरत्नम (maniratnam). आजवरच्या कारकिर्दीत त्यांचे असंख्य सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करायची संधी कोणताही कालाकार सोडत नाही. मात्र, अभिनेत्री काजोलने (kajol) तिच्या दारात चालून आलेली संधी सोडली. मस्करी समजून तिने मणिरत्नम यांचा फोन कट केला आणि त्याचसोबत तिला मिळणारा सिनेमाही तिच्या हातून निसटला. 'कॉफी विथ करण 8' मध्ये नुकताच याविषयीचा खुलासा झाला आहे.

सोशल मीडियावर सध्या 'कॉफी विथ करण 8' चा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये करणने (karan johar) काजोलच्या हातून मणिरत्नचा सिनेमा कसा गेला याविषयी सांगितलं.  मणिरत्नम यांचा 'दिल से' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या सिनेमात शाहरुख खान (shahrukh khan) आणि मनिषा कोईराला (manisha koirala) यांची मुख्य भूमिका होती. विशेष म्हणजे मनिषापूर्वी हा सिनेमा काजोलला मिळणार होता. मात्र, तिने थोडक्यात ही संधी गमावली.

"मला अजूनही तो दिवस आठवतोय ज्यावेळी मी शाहरुख खानला माझ्या सिनेमाची स्टोरी ऐकवली होती. त्यावेळी तो त्याच्या जुन्या घरी अमृत अपार्टमेंटमध्ये रहायचा. आम्ही त्याच खोलीत बसलो होतो ज्याला गच्ची लागूनच होती. तू (काजोल) रडत होतीस. मी सुद्धा स्टोरी सांगताना रडत होतो. शाहरुख आपल्याकडे अशा नजरेने पाहात होता जसं काय या दोघांना वेड लागलं"य, असं करण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मला हे सुद्धा चांगलं आठवतंय ज्यावेळी तुला मणिरत्नम यांचा फोन आला होता. त्यावेळी तू म्हटलं होतंस 'कोण बोलतंय?' त्यांनी सांगितलं 'मी मणिरत्नम बोलतोय'. त्यावर तू म्हणाली, 'हो आणि मी टॉम क्रूझ आहे', असं म्हणत तू फोन कट केला होतास."

दरम्यान, मणिरत्नम यांनी काजोलला दिल से सिनेमाची ऑफर देण्यासाठी फोन केला होता. मात्र, हा कोणता तरी फेक कॉल आहे असं समजून काजोलने त्यांचा फोन कट केला. त्यानंतर त्यांनी हा सिनेमा मनिषा कोईराला आणि प्रिती झिंटाला ऑफर केला आणि त्यांची या सिनेमासाठी वर्णी लागली. हा सिनेमा काजोलने धुडकावल्यानंतर तिने कुछ कुछ होता हैं हा सिनेमा केला.

टॅग्स :काजोलकरण जोहरमणी रत्नमबॉलिवूडसिनेमा