सध्या एका दाक्षिणात्य चित्रपटाची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या तेलुगु चित्रपटाने अवघ्या ११ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ७० कोटींची कमाई केली आहे. इतक्या कमी दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केल्यामुळे जिकडेतिकडे या चित्रपटाबाबत चर्चा होताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर डंका करणाऱ्या या चित्रपटाचं नाव ‘बेबी’ असं असून १४ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
‘बेबी’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल सात कोटींची कमाई केली होती. त्यानंतर १० दिवसांत या चित्रपटाने ६६ कोटींचा आकडा पार केला. तर ११ दिवसांत जगभरात ७० कोटींची कमाई करत ‘बेबी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई नीलम यांनी केले असून अवघ्या १४ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे.
“मी बहिरी नाहीये”, पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “म्हणून अमिताभ बच्चन...”
‘बेबी’ या चित्रपटाची कथा दोन युवकांच्या लव्हस्टोरीवर आधारित आहे. वैष्णवी आणि आनंद ही दोन पात्र शालेय जीवनात एकमेकांवर प्रेम करत असतात. हलाखीच्या परिस्थितीमुळे आनंदला पुढील शिक्षण घेता येत नाही. पण, वैष्णवी शिक्षण घेऊन इंजिनीयर होते. त्यानंतर तिच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती येते. पण, आनंदच्या आयुष्यातील वैष्णवीचं महत्त्व अद्याप कमी झालेलं नाही. ही साधी पण भावनिक कथा असलेली लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
‘ओपेनहायनर’मधील भगवद्गीतेच्या ‘त्या’ सीनवर भडकली मराठी अभिनेत्री, म्हणाली, “हिंदू-मुस्लीम...”
या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद देवराकोंडा मुख्य भूमिकेत आहे. याबरोबरच वैष्णवी चैतन्य, विराज अश्विन, नागेंद्र बाबू या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.