या अभिनेत्रीसाठी आईवडिलांनी निवडला नवरा मुलगा, लवकरच अडकणार लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 08:00 AM2019-11-05T08:00:00+5:302019-11-05T08:00:10+5:30
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अकडणार आहे.
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अकडणार आहे. ही अभिनेत्री कोण तर काजल अग्रवाल. होय, ताज्या मुलाखतीत खुद्द काजलने हा खुलासा केला. रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलायला तिने नकार दिला. पण मी लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले.
काजल एका बिझनेसमॅनला डेट करत असल्याचे मानले जात आहे. मात्र काजलने याबद्दल बोलायला नकार दिला. लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मात्र ती भरभरून बोलली. होणा-या नव-यात काय काय गुण असावेत, असे विचारले असता, तो अध्यात्मिक, माझी काळजी घेणारा आणि प्रेमळ असावा, असे ती म्हणाली.
फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्तिशी लग्न करण्याचे कुठलेही प्लॅनिंग नसल्याचे ती म्हणाली. तिने सांगितले की, ‘खूप आधी माझा एक बॉयफ्रेन्ड होता. पण बिझी शेड्यूलमध्ये आमच्या नात्यात दुरावा आला आणि हे नाते संपुष्टात आले. आता मी लग्नाचा निर्णय घेतला आहे. 2020 मध्ये मी लग्न करणार आहे. ’
सूत्रांचे मानाल तर, काजल एका बिझनेसमॅनशी लग्न करणार आहे. काजलच्या आईवडिलांनी तिच्यासाठी हा मुलगा निवडला आहे. हे अरेंज मॅरेज असेल.
काजलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, सध्या ती दोन साऊथच्या सिनेमात बिझी आहे. लवकरच ती कमल हासन स्टारर ‘इंडियन 2’ या सिनेमात दिसेल. यानंतर ‘मुंबई सागा’ या सिनेमात झळकणार आहे. काजलने साऊथच्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.
रजनीकांत, चिरंजीवी, नागार्जुन, महेश बाबू, प्रभास, ज्युनिअर एनटीआर, रामचरण अशा अनेकांसोबत ती दिसली आहे. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. काजल आज साऊथ सिने इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते.