Beast Trailer : ‘मास्टर’ फेम थलापती विजयचा (Thalapathy Vijay) ‘बीस्ट’ (Beast) हा सिनेमा येत्या 13 एप्रिलला रिलीज होतोय. पण तूर्तास हवा आहे तर ‘बीस्ट’च्या ट्रेलरची. होय, विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर रिलीज झालाये आणि या ट्रेलरनं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. ट्रेलर पाहून क्रेजी फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झालेय. ट्विटरवर ‘बीस्ट’चा ट्रेलर सुपर ट्रेंड करतोय. हजारो युजर्स यावर प्रतिक्रिया देत आहेत. #ThalapathyVijay या हॅशटॅग अंतर्गत आत्तापर्यंत 1 लाखांवर युजर्सनी ट्विट केलं आहे.
16 तासांत 2.3 व्ह्युजट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. अगदी 16 तासांत 2.3 कोटींपेक्षा अधिक लोकांनी ट्रेलर पाहिलाय. विशेष म्हणजे हा फक्त आकडा युट्यूबचा आहे. इन्स्टाग्रामचा आकडा वेगळा आहे.
हजारो लोक रस्त्यावर‘बीस्ट’चा ट्रेलर रिलीज होताच तामिळनाडूच्या रस्त्यांवर विजयच्या फॅन्सनी आनंद साजरा केला. ट्रेलर पाहण्यासाठी चित्रपटगृहांबाहेर आणि रस्त्यांवर मोठं मोठे स्क्रिन्स लावण्यात आले होते आणि हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर रस्त्यावर एकच जल्लोष केला. याचे अनेक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत.
‘बीस्ट’ला मिळणार जबदस्त ओपनिंग‘बीस्ट’आधी थलपती विजयचा ‘मास्टर’ हा सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटानेही धुमाकूळ घातला होता. कोरोना महामारीकाळात रिलीज होऊनही या चित्रपटानं कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. आता ‘बीस्ट’ची वाटचालही याच दिशेने सुरू आहे. ‘बीस्ट’च्या ट्रेलरला मिळालेला जबरदस्त प्रतिसाद बघता थलपती विजयचा हा सिनेमाही अनेक विक्रमांवर नाव कोरणार, असं जाणकारांचं मत आहे. ‘बीस्ट’ला जोरदार ओपनिंग मिळेल, असाही अंदाज बांधला जातोय. येत्या 13 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहांत झळकणार आहे.