२०२२ मधील सर्वांत दीर्घ प्रतीक्षेतील चित्रपट म्हणजे ‘वलिमाई’. या वर्षातील सर्वोत्तम अॅक्शन थ्रिलर्सपैकी एक समजल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच युट्यूबवर तुफान गाजले आणि या प्लॅटफॉर्मवरील सर्वाधिक आवडला गेलेला व्हिडीओ बनले. याच थराराला स्क्रीनवर आणत ह्या चित्रपटाने सर्वांत प्रतीक्षेतील सुपर कॉप, सिंपथेटिक कॉप, सपोर्टिव्ह कॉप असिस्टंट कमिशनर अर्जुन अजिथ कुमार आणि अतिशय उत्तम अभिनेत्री हुमा कुरेशी, कार्तिकेय गुम्माकोंडा आणि बानी जे हे महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहे. सॅटर्डे प्रीमिअर पार्टीमध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर होत असून मास्टरमाईंड का फूल ऑन अॅक्शन अनुभवण्यासाठी सज्ज व्हा ३ सप्टेंबर रोजी ८ वाजता फक्त अॅण्ड पिक्चर्सवर.
स्टाईल, धमाका, अफलातून बाईक पाठलाग आणि काही मृत्यूलाही घाबरवतील असे स्टंट्स – जर तुम्ही अॅक्शनचे चाहते असाल तर ही तुमच्यासाठी नक्कीच एक पर्वणी असेल कारण असिस्टंट कमिशनर अर्जुन गुन्ह्यांमागे दडलेला मास्टरमाईंड शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. पण एवढेच नाही, ‘वलिमाई’ हा चित्रपट एक संदेशही देतो ज्यात आपल्याला पाहायला मिळतो एक सामाजिक स्तरावर जबाबदार पोलिस अधिकारी जो गुन्ह्यांमागे दडलेल्या आर्थिक–सामाजिक कारणांना व्यवस्थित समजतो आणि त्याचा असा विश्वास आहे की गुन्हेगारांनासुद्धा दुसरी संधी मिळायला हवी.या चित्रपटाबद्दल हुमा कुरेशी म्हणाली “अॅक्शन हा प्रकार प्रेक्षकांचा आवडता असून त्यात आणखी वेगाने वाढ होत चालली आहे. आणि आता स्त्रियाही पुढे येत असल्याने हा प्रकार आणखी रोमहर्षक बनण्याची शेकडो अधिक कारणे आहेत. ‘वलिमाई’सारखे चित्रपट आपल्या हटके कथानकासह आधुनिक अॅक्शन दृश्ये आणि शत्रूंशी दोन हात करणाऱ्या बळकट स्त्री भूमिका पुढे आणतात. बाईक चालवणे शिकण्यापासून ‘कधीही झुकणार नाही’ ह्यासारखे अॅटिट्यूड माझ्यात आणणाऱ्या ह्या चित्रपटाने मला ताकद दिली आणि लढाऊ बनवले. हा चित्रपट पाहतानाही सर्वांना असेच वाटावे असे मला वाटते.”