Join us

South vs Bollywood: सुनील शेट्टीनंतर आता मनोज वाजपेयीनं साउथच्या सिनेमांवर साधला निशाणा, म्हणाला- 'कोणीच...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 3:45 PM

Bollywood Vs South Cinema : सध्या साउथ विरूद्ध बॉलिवूड असा वाद रंगला आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी(Manoj Bajpayee)चीही प्रतिक्रिया आली आहे.

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी लोकप्रिय आहे. सध्या साउथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूड असा इंडस्ट्रीमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, एका मुलाखतीत मनोज वाजपेयीने १००० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या चित्रपटांबद्दल वक्तव्य केले आहे. मनोज वाजपेयी म्हणाला की, चित्रपट कसा आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही. प्रत्येकजण फक्त आकड्यांबद्दल बोलत आहे.

मनोज वाजपेयी मुलाखतीत म्हणाला, 'चित्रपट कसा आहे यावर कोणी बोलत नाही? कामगिरी कशी आहे हे कोणी बोलायला तयार नाही. बाकी विभागाचे योगदान काय? काय आहे ना आपण सगळे १००० कोटी आणि ३०० कोटी आणि ४०० कोटींमध्ये अडकलो आहोत. गेली अनेक वर्षे हा वाद सुरू आहे आणि तो संपणार नाही असे मला वाटते. 

मनोज वाजपेयी पुढे म्हणाला, 'आता समीक्षक म्हणत आहेत की तुम्ही त्यांच्यासारखे चित्रपट का बनवत नाही? तुमचे चित्रपट चालत नाहीत? हे मुख्य प्रवाहात असणाऱ्यांना विचारले जात आहे. ते या जगातील हिस्सा कधीच नव्हते. ते कधीकधी काही कारणास्तव या जगाचा भाग असायचा पण नंतर परत येत होते, असेही अभिनेता यावेळी म्हणाला.मनोज वाजपेयीने सांगितले की, आधी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करणे आमच्यासाठी कठीण होते. मात्र आता १००० कोटींची कमाई करणाऱ्या चित्रपटांमुळे ते अधिक कठीण झाले आहे. OTT आमच्यासारख्या कलाकारांसाठी आणि इतर प्रतिभावान लोकांसाठी वरदान ठरले आहे. ओटीटीमुळे आणि दमदार काम करण्यासाठी आपण सर्व व्यस्त आहोत हे पाहून बरे वाटते.

टॅग्स :मनोज वाजपेयीसुनील शेट्टी