Join us

Video: 'जवान'चं साऊथस्टाईल स्वागत; शाहरुखचे मोठे कटाऊट, नारळ अन् दूधही वाहिलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 4:03 PM

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) सिनेमा आज रिलीज झाला.

मुंबई - बॉलिवूडचा बादशहा किंग खान शाहरुखचा जवान चित्रपट आज चाहत्यांच्या भेटीला आला आहे. देशभरातून चाहत्यांनी जवानचं स्वागत केलं असून चित्रपटगृहात टाळ्या आणि शिट्ट्यांनी चित्रपटाला दाद मिळत आहे. त्यामुळेच, पहिल्याचदिवशी बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्यात जवानला यश मिळालं असून पहाटेपासून चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांची झुंबड उडाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे जवान चित्रपटाचं साऊथस्टाईलनेही स्वागत झालं आहे. शाहरुखचा मोठा कटाऊट उभारुन त्यावर दूधही वाहण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आला आहे. 

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित 'जवान' (Jawan) सिनेमा आज रिलीज झाला. २०२३ च्या सुरुवातीलाच शाहरुखने 'पठाण' मधून आपली जादू दाखवली. तर आता 'जवान'साठी चाहते खूपच आतुर होते. सकाळी ६ वाजताच चाहते थिएटरबाहेर जमा झाले आणि सर्वांनी एकच जल्लोष केला. आज 'जवान' पहिल्याच दिवशी कमाईचा पाऊस पाडेल की काय असं चित्र दिसत आहे. शाहरुखची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. सकाळी ६ च्या शोलाही होणारी गर्दी आणि चाहत्यांचा धिंगाणा याचं जीवंत उदाहरण आहे. विशेष म्हणजे क्रेझी फॅन असणाऱ्या साऊथमध्येही शाहरुखचे फॅन आहेत. म्हणूनच तामिळनाडूत 'जवान'चे साऊथ स्टाईल स्वागत झालंय. 

चेन्नईतील एका सिनेमागृहाबाहेर शाहरुखचा मोठा कटाऊट लावण्यात आला आहे. या पोस्टरला फुलांचे हार घालण्यात आले असून दूधही अर्पण करण्यात आले आहे. पोस्टरसमोर येऊन चाहत्यांनी नारळही फोडले आहेत. त्यामुळे, अगदी साऊथस्टाईल स्वागत जवान चित्रपटाचं होताना पाहायला मिळत आहे. शाहरुखच्या या पोस्टरसमोर ढोला-ताशा वाजवत चाहत्यांचा डान्सही पाहायला मिळतोय. बंगळुरूमध्येही तशाच प्रकारे सिनेमागृहाबाहेर चाहत्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. 

आजचा दिवस खरं तर सुट्टीचा नाही. पण तरी थिएटर्सबाहेर जे वातावरण आहे ते अगदी सुट्टीसारखंच आहे. कारण शाहरुख खानच्या 'जवान'ने थिएटर्समध्ये धडक दिली आहे. चाहत्यांमध्ये सिनेमासाठी जी उत्सुकता दिसून येतेय ते बघता जवान कोटी रुपयांचा पाऊस पाडेल अशी शक्यता आहे. 'जवान' फर्स्ट डे फर्स्ट शओ पाहण्यासाठी मुंबईतील गेटी गॅलक्सी थिएटर बाहेर चाहते सकाळी  ६ वाजताच जमा झाले. ढोल वाजवून, डान्स करुन त्यांनीच एकच जल्लोष केला. 'जवान'चे पोस्टर्स घेऊन लोक शिट्ट्या वाजवत धमाल करताना दिसले. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसिनेमाजवान चित्रपटतामिळनाडू