Join us

स्पृहा जोशीचं चाहत्यांना एक खास सरप्राइज; ‘या’ लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्यासोबत झळकणार हिंदी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:54 IST

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी आता हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तसेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर तिच्या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे.

स्पृहा आता हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. स्पृहाने या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहलं की, “बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौदा फॉर मिश्रा परिवार”.  तरर ‘सब मोह माया है’ असं या हिंदी चित्रपटाचे नाव आहे. 

स्पृहाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास स्पृहा जोशीमराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. उत्तम अभिनयासह स्पृहा एक उत्तम निवेदिका आणि कवयित्रीदेखील आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रामध्ये स्पृहाचा दांडगा वावर आहे. त्यामुळेच आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. अलिकडेच स्पृहा लोकमान्य या मालिकेत झळकली होती. परंतु, नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

टॅग्स :स्पृहा जोशीबॉलिवूडमराठी अभिनेता