Join us

'मी नकार दिला म्हणून त्याने...' श्रीदेवीने सांगितली होती बॉलिवूडची काळी बाजू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 12:48 PM

Sridevi: एका अभिनेत्याने श्रीदेवीसोबत जवळीक साधायचा प्रयत्न केला होता. पण..

बॉलिवूडची हवाहवाई गर्ल अर्थात श्रीदेवी (Sridevi) यांचं निधन होऊन आज बरीच वर्ष लोटली. मात्र, आजही त्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याशी निगडीत अनेक किस्से रंगता. यात त्यांच्या फिल्मी करिअरपासून पर्सनल लाइफपर्यंत अनेक गोष्टींची चर्चा होते. आज श्रीदेवी यांची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी बॉलिवूडची डार्क बाजू सांगितली होती. कलाविश्वात नाव, प्रसिद्धी मिळाली. परंतु, त्यापूर्वी  त्यांनी काही वेळा लैंगिक छळाचाही सामना करावा लागला होता.

श्रीदेवी यांनी अगदी कमी वयात त्यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. या कारकिर्दीमध्ये त्यांनी जवळपास ३०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. श्रीदेवी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं बोलायच्या नाहीत. मात्र, करिअरविषयी, बॉलिवूडविषयी स्पष्टपणे व्यक्त व्हायच्या. सूत्रांच्या माहितीनुसार, एका मुलाखतीमध्ये श्रीदेवी यांनी त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचविषयी भाष्य केलं होतं. एका अभिनेत्याला त्यांनी नकार दिल्यामुळे त्याने थेट श्रीदेवीच्या पायावरुन गाडी नेली होती.

एका अभिनेत्याने श्रीदेवीसोबत जवळीक साधायचा प्रयत्न केला होता. पण, श्रीदेवीने त्याला विरोध केला. तिचा विरोध पाहिल्यानंतर हा अभिनेता चांगलाच संतापला. तिचा नकार सहन न झाल्यामुळे त्याने तिच्या पायावरुन जीप नेली होती, असं श्रीदेवी यांनी सांगितलं होतं. पुढे त्या म्हणाल्या होत्या, "लोकांना वाटतं की मला सगळ्या गोष्टी सहज मिळाल्या आहेत. मी काही अनुभव घेतला नाही. पण, खऱ्या आयुष्यात मी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे."

दरम्यान, श्रीदेवीने बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत लग्न केलं. त्यांची लव्हस्टोरी कोणत्याही फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. 'मिस्टर इंडिया' सिनेमाच्या सेटवर ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली होती. श्रीदेवी आणि बोनी यांना जान्हवी आणि खुशी या दोन लेकी आहेत. श्रीदेवी यांचा २०१८मध्ये दुबईतील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड