Join us  

खुशी कपूरने खरेदी केली 'ड्रीम कार', कोट्यवधींची किंमत असणारी गाडी पुन्हा एकदा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:02 AM

एकच चित्रपट केला, तोही फ्लॉप झाल, तरीही खुशी कपूरने आलिशान कार खरेदी केली आहे.

Khushi Kapoor Buys Mercedes Benz G 400d : बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर (Khushi Kapoor) ही कायम चर्चेत असते. खुशी कपूर ही बॉलीवूडमधील सर्वात हॉट स्टार किड्सपैकी एक आहे. तिनं अगस्त्य नंदा, सुहाना खान यांसारख्या कलाकारांसोबत 'द आर्चीज'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, हा सिनेमा फ्लॉप ठरला. यातच आता खुशी कपूरने आलिशान कार खरेदी केली आहे.

नुकतीच खुशी कपूर तिच्या लाल रंगाच्या कारमध्ये पाहायला मिळाली. खुशीने Mercedes Benz G 400d ही कार खरेदी केली आहे. खुशी कपूरच्या या  कारची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. आता चाहते खुशीचं अभिनंदन करत आहेत. खुशी कपूर ही जान्हवी कपूरची धाकटी बहीण आहे. दोघीही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. 

खुशीच्या या नव्या कारमध्ये ट्रेडिशनल लॅडर फ्रेमिंग आहे. त्यामुळे ऑफ-रोड ड्रायव्हिंग सेटअपसह एक विशेष G-मोड पूर्ण होतो.  कारमध्ये AMG लाइन व्यतिरिक्त, एक नवीन G 400d Adventure Edition आहे. ही डिझाइन खास भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आले आहे. स्लाइडिंग सनरुफ, बर्मेस्टर साउंड सिस्टीण, ६४ रंगाची लाइटिंग अशा खास फीचर्सचा समावेश देखील या कारमध्ये करण्यात आला आहे.मर्सिडीज-बेंझ ही भारतातील सर्वात जुनी लक्झरी ऑटोमोबाईल उत्पादक आहे .

टॅग्स :खुशी कपूरबॉलिवूडसेलिब्रिटीजान्हवी कपूर